मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ध्येय!

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव

वाचने 3853 वाचनखूण प्रतिक्रिया 9

क्रान्ति Sat, 08/01/2009 - 15:35
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! अप्रतिम! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

प्राजु Tue, 08/04/2009 - 00:58
कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by घाटावरचे भट

अनिल हटेला Tue, 08/04/2009 - 12:46
सहमत...... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

राघव Tue, 08/04/2009 - 18:11
सर्वांचे मनापासून आभार. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )