Skip to main content

कविता

मनातली शाळा

लेखक हृषीकेश पतकी यांनी बुधवार, 19/08/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं | मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो | गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही | अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही || रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण | वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण || पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो | चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो || इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे | हमखास हातचा

तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 19/08/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!

(सहज चोळले..)

लेखक ज्ञानेश... यांनी मंगळवार, 18/08/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले" -------------------------------- सहज चोळले मी पाठीला जाता जाता क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :( किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही, मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =(( मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|: लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले.. कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B 'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता..
काव्यरस

सहज चाळले..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 18/08/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
सहज चाळले आठवणींना जाता जाता क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता "स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता जनांत नाही डोळा कधी आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता - प्राजु
काव्यरस

(तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 18/08/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शाहरुख ह्यांची 'तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!' कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !! लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !! परत्येक अवांतर परतिसादाव येक चांदनी मोजत्यात आनी मार्केटातल्या दलालावानी बेरीज वजाबाकी करत्यात आसला काय बी हिसाब आमी नाय मांडनार तरीबी तिच्यायल
काव्यरस

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 18/08/2009 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात आसलं काय गनित आमी नाय मांडनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमद
काव्यरस

मी एक सिग्नल पिवळा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 17/08/2009 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा कुणी पाळला , कुणी तोडला कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही भावनांचा सागर आटलेला , मी एक स

स्वातंत्र्यदिन (?) चिरायु होवो ......!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का?
काव्यरस

गिफ्ट

लेखक हृषीकेश पतकी यांनी सोमवार, 17/08/2009 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
good morning चा sms वाचताना माझे डोळेच इतके दमलेले असतात | आणि कुशीत शिरावसं वाटतं तेव्हा पालक office मध्ये रमलेले असतात || २१ व्या शतकात तंत्रज्ञान इतकं म्हणून झेपावलं आहे | मुलाला सकाळी उठवण्याचं काम आईने mobile वर सोपावलं आहे || TV,Cell,comp आणि i-pod दिवस माझा तारुन नेतात | AC त बसून दमलेले आई बाबा मग almost रात्रीच घरी येतात || रेडीमेड pizza खायला मग अजिबातंच वेळ लागत नाही | पोट गच्चं भरतं त्याने पण भूक मात्र भागत नाही || आजी असतानाचं घर आमचं आता पूरवी सारखं राहिलं नाहीये | kitchen मध्ये काम करताना मी आईला कित्येक दिवसात पाहीलं नाहीये || रात्री एकटक serials बघताना मग त्यांचा ch

कृष्णार्पण

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 16/08/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ रंगांचा एकदा झाला मोठा वाद सारे म्हणती मीच श्रेष्ठ हेच निर्विवाद शांतीप्रीय आम्ही हिरवा, निळा, जांभळा, भडक व गर्विष्ट, लाल, नारींगी, पिवळा प्रत्ये्कजण केवळ गाती आपली महती मी श्रेष्ठ म्हणतांना इतरांस नावे ठेवती काहीच करून त्यांचा वाद नाही शमला तेव्हा लोलक धरून पांढरा सरसावला बघा जरा म्हणत लोलका मधून तो गेला अनेक रंगांचा फ़ुलोरा दुसऱ्या बाजूने आला वेड्यांनो तुम्ही सारे माझेच आहात अंश पांढऱ्यानेच बनवले सगळ्या रंगांचे वंश सारे रंग गप्प बसले, पांढरा आनंदे नाचला म्हणे मीच विश्व विजेता निर्विवाद ठरला कृष्ण रंग बघत होता गुपचूप तमाशा म्हणाला सगळ्यांना या माझ्यासवे बसा एकेक करून रंग
काव्यरस