तिने एक कविता केली
अन् विचारले "कशी वाटली"?
मी म्हणालो
"नदी, झरे, चांदण्यांची
पान भरुन दाटी झाली"
कविता कशी हवी
वास्तवदर्शी अन् आरस्पानी
काळजाला भिडणारी
मनाला जरा पिडणारी
विचार करायला लावणारी
अन् काळाबरोबर धावणारी
(म्हणजे नको नॉस्टेलजिक )
ती म्हणाली " अरे ,आपण
वास्तवतर जगतोच आहोत
मग कविता हवी कशाला
तू वास्तवाच्या ऐदीसाठी
स्वप्ने घेतोसच कि उश्याला.
कवितासुध्दा एक स्वप्न -
मुक्त विचारांना पडलेलं
त्यामध्ये मग काहिही येईल
पानं, फुलं, टोपड, झबलं
कवितेतलं वास्तव म्हणजे
नक्की रे असतं काय ?
-वास्तवतेच्या भावनांना
कल्पनेचेच ना असतात पाय ?
नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?
याद्या
3456
प्रतिक्रिया
19
लेखनविषय:
मिसळपाव
आवडली कविता...
आठवणींचे रान
वा!
सुंदर!
व्वा ! पिंपळपानने
सुरेख!
वा दत्ताजी
कवितासुध्
सुंदर
धन्यवाद
शेवटचं
काही विचार
धनंजयजी , तुमचे म्हणणे असे आहे, कि . . . .
सत्यात अशी बुजगावणी नसू शकतात ? - ह्याबद्दलचे नेमके म्हणणे.
उपमा या द्योतक असतात
चर्चा
कविता आवडली !!
धनंजयजी तुमचे तुम्ही सुरवातीला मांडलेले विचार,
:)