Skip to main content

मल्हारसांज

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 03/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मल्हारसांज गर्भारलेली उदरी निशा अशांत ओली दिशांची दिशांना पुन्हा आर्त साद डोहाळे पुरवी जलांच्या पखाली घनभार हल्के जाता झरून कृष्णांबरही झुके सावरून आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली घनन घनन घनवृंद घुमा सागर पाश क्षितिजी गनिमा पश्चिमा सलज्ज निरखे प्रतिमा लहरींच्या अधरी, पवनाच्या चाली घुले श्यामरंगी, नभाची निळाई विरत्या परिघा, समीपाची घाई अधीरल्या प्रभेची कवडशी धिटाई रवी पांघरूनी निजे मेघशाली
लेखनविषय:

वाचने 2430
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता आवडली.

छान कविता. 'मल्हारसांज' शब्द खूप आवडला. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

आयला! लै भारी...! शब्द मात्र अवघड वापरले आहेत. अंमळ जडच गेले... आम्हाला साधे सोपे शब्द असलेल्या कविता पटकन समजतात आणि आवडतात..
आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली
हे शब्द त्यातल्या त्यात समजले... आपला, (मठ्ठ) तात्या.

कौतुका, स्वागत रे! मस्त !! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...