Skip to main content

बेधडक जगायचय

प्रकाशित मुखपृष्ठ
ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत दुर कुठेतरी भिरकवायचय, ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन वार्‍याच्या वेगाने धावायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन त्यानांच ठेंगा दाखवायचाय, जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय, आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय, जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय, तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन माझे प्रेम तिला सांगायचय, तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय पावसाचा थेंब होउन कड्यावरुन दरीत कोसळायच, नदी नाल्यातुन , ओढ्यातुन वहात वहात सागराला जाउन मिळायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय ऑफिसला मारुन बुट्टी , बॉसला फाट्यावर मारायचय हे आयुष्य मला माझ्या मनाचा राजा होउन जगायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

याद्या 1422
प्रतिक्रिया 4

लेखनविषय: