लेखकक्रान्तियांनी गुरुवार, 11/02/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य
लेखकउदय सप्रेयांनी मंगळवार, 09/02/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आत्महत्येचे खूपच प्रकार आणि कारणे ऐकू येतात्.....मन अगदी विषण्ण होते हे वाचून , ऐकून्.....म्हणून काही सुचलय ते मांडतोय.....
हवी.....
मरणाचा तुज ध्यास उगा का?
जगण्याची ही आस हवी
इतरांची सामान्य ठरावी...
अपुली "स्टाईल" खास हवी !
गुणवत्तेच्या यादीवरती
नाव असो वा नसो तुझे,
'पडलो तरीही अडलो नाही!'
धडपडी अशी ही प्यास हवी !
कुणी कुणाला आवडते
तर कुणास कोणी ठोकरते ,
जुने कशाला याद करावे?
दाद सदा....नव्यास हवी !
उजेड कोणा जास्त भावतो
मिणमिणता कोणास हवा !
कवाड ज्याचे तो उघडू दे,
जळण्याची सवय्.....दिव्यास हवी !
लेखकशाहरुखयांनी मंगळवार, 09/02/2010 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा
साय वरची आत दुधाचा साठा
चोरटे आयुष्य देतो मालकास धोका
बंद जरी असली घराची खिडक्या दारे
एक तरी असतोच ना उघडा झरोका
चोरणे हा वारसा की धर्म माझा?
सोडेन कैसा मी एकतरी मोका
सोबती जरी काळोखगर्भाचा उबारा
सापडतो अचुक मज फडताळातील चक्का
ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा
बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका
हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका
तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !!
-कवी शाहरुख
लेखकचतुरंगयांनी सोमवार, 08/02/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग....
पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा
बायडी आभास नुसता, रोज धोका!
बंद केली 'डायराने' सर्व दारे
आयडी आला कसा, नसता झरोका?
बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
सोबती संपादकत्त्वाचा उबारा,
आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका
बास आता सोंग हे वैचारिकांचे
कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा!
-चतुरंग
लेखकफ्रॅक्चर बंड्यायांनी शुक्रवार, 05/02/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगांनाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत
कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे
कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे
कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..
कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे..
लेखकउदय सप्रेयांनी शुक्रवार, 05/02/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते !
म्हणून.....
ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ?
नाही, मला काही हौस नाहिये ,
ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून !
रात्रभर मोगर्यातली ती वेणी सोडू?
मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे?
नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून !
श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू ,
थरथरत्या तनूला कवेत घेऊ का?
न
लेखकउदय सप्रेयांनी गुरुवार, 04/02/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच होते.....
हाय ! तुजला जिंकले त्याने जरी ,
ओठी तुझ्या पण नाव ते .....माझेच होते !
माळू दे त्याला तुझ्या केसांत गजरा ,
गंधदायी मोगरे.....माझेच होते !
स्पर्शता त्याने तुला जे लाभले ,
सगळे जुने शहारे.....माझेच होते !
एकही खुलली जरी ना स्मीतरेषा ,
दाबलेले हुंदके.....ताजेच होते !
अंतरी तुझिया जरी झंकारलो
झाकलेले प्रेतही.....माझेच होते !