Skip to main content

हवी.....

हवी.....

Published on 09/02/2010 - 16:44 प्रकाशित मुखपृष्ठ
हल्ली आत्महत्येचे खूपच प्रकार आणि कारणे ऐकू येतात्.....मन अगदी विषण्ण होते हे वाचून , ऐकून्.....म्हणून काही सुचलय ते मांडतोय..... हवी..... मरणाचा तुज ध्यास उगा का? जगण्याची ही आस हवी इतरांची सामान्य ठरावी... अपुली "स्टाईल" खास हवी ! गुणवत्तेच्या यादीवरती नाव असो वा नसो तुझे, 'पडलो तरीही अडलो नाही!' धडपडी अशी ही प्यास हवी ! कुणी कुणाला आवडते तर कुणास कोणी ठोकरते , जुने कशाला याद करावे? दाद सदा....नव्यास हवी ! उजेड कोणा जास्त भावतो मिणमिणता कोणास हवा ! कवाड ज्याचे तो उघडू दे, जळण्याची सवय्.....दिव्यास हवी !
लेखनविषय:

याद्या 1332
प्रतिक्रिया 3

उजेड कोणा जास्त भावतो मिणमिणता कोणास हवा ! कवाड ज्याचे तो उघडू दे, जळण्याची सवय्.....दिव्यास हवी ! सही! अगदी खास! क्रान्ति अग्निसखा

उजेड कोणा जास्त भावतो मिणमिणता कोणास हवा ! कवाड ज्याचे तो उघडू दे, जळण्याची सवय्.....दिव्यास हवी ! फार फार सुंदर!! मस्तच! - प्राजक्ता http://www.praaju.com/

सकारात्मक कविता .... आवडली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)