Skip to main content

कविता

जन्मा येण्या कारण तू..

लेखक प्राजु
सोमवार, 08/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मा येण्या कारण तू, प्रितीचं अभिसारण तू सारे जीवन फ़ुलवणारी, सुखाची पाखरण तू वसंताचं आगमन तू, कंच हिरवा श्रावण तू सावळ्या नभी फ़ुललेलं, शरदाचं चांदण तू सळसळणारं यौवन तू, निळंजांभळं गगन तू क्षितिजावरती पसरणारं, लोभस सूर्यकिरण तू लावण्याची उधळण तू, नात्यांमधली गुंफ़ण तू अनेक धागे बांधणारं, एक अतूट बंधन तू दु:खाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू गंधभरल्या फ़ुलाफ़ुलांचं, सुंदर मोहक अंगण तू.. शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्‍यातलं चंदन तू भाळावरचं गोंदण तू, नवरत्नांचं कोंदण तू विसवण्या या जगताला गे, मिळालेलं आंदण तू - प्राजु सर्वांना महिलादिनाची हार्दिक शुभेच्छ
काव्यरस

चंदनाचे जीवन

लेखक moghe
शुक्रवार, 05/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चंदनाचे जीवनच असं असते, नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते स्वत: मरत असला तरी, लोकांसाठी जगायचे असते नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं नको असलेली काही नाती आयुष्यभर वागवावी लागतात, आणि मनात जपलेले काही बंध आयुष्यभर अबोलच राह
काव्यरस

कवितक -१ माणूस अशातला - माणूस तशातला

लेखक चित्रा
गुरुवार, 04/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसावरून सुचलेले हे काव्यरत्न. ते प्रो. घासकडवी यांच्या मार्गदर्शनपर लेखाला आलेल्या विविध रसांतील काव्यांत कुठेतरी गहाळ झाले असते, म्हणून इथे टंकणार आहे. अर्थातच देवी सरस्वती आणि प्रो. घासकडवी यांना आदरपूर्वक प्रणिपात करून. रस अर्थातच भयंकर. हास्य, करूणा, वीर, अद्भुत यांच्या सगळ्यांच्या मिश्रणाने तयार झालेले हे मिश्रण केवळ भयंकरच असू शकते. तेव्हा सादर आहे आमची काव्याची पाककृती - क्ष - माणूस य - मनातला, गाण्यातला, धंद्यातला, वांध्यातला (ही विशेषणेही होऊ शकतात, याने आम्ही कवितकांमध्ये वरच्या लेव्हलला पोचतो का?
काव्यरस

श्वास

गुरुवार, 04/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मी उरतो ,कधी मी पुरतो एकमेव मी कधी न भुलतो साथ माझी रे जन्मापासुनी मी संपता जीव ना उरतो कधी उश्वास नधी निश्वास नावं माझी अनेक हृदयाशी मैत्री माझी फक्त श्वास म्हणूनच नेक कधी शरीर, कधी काया जेथे मी तेथे माया क्षणार्धात मी सोडूनी जाता नाती गोती सर्वही वाया काळ मी आज मी सुरवात मी शेवट मी अनादी मी अनंत मी दिव्यासारखा तेवत मी दिव्यासारखा तेवत मी

कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.........

बुधवार, 03/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती......... साधी सोज्वळ निरागस होती पण जगाचे भान मित्रत्वाची सान चांगलेच ओळखून होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी हातात हात नसेल कदाचित पण डोळ्यानेच मला समजून घेत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो ती हि कधी हा विचार करत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो माझ्या साठी वाट पाहत गेट बाहेर उभी होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी

सोहम

मंगळवार, 02/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आता रोजच यावसं वाटतं तुझ्याकडे, तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला, पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते, माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तुझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली. तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे पण तरिही वेडं मन तूला माणसात शोधायला जाते तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते आणि धावुन धावुन थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तुझी शितल छाया आणि अथांग प्रेम
काव्यरस

फुलांच्या थव्यांनी..

लेखक प्राजु
सोमवार, 01/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे तुझा गंध लेऊन गंधीत व्हावे.. तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे' जसा चंद्र अवनीस बिलगून जावा तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.. - प्राजु वृत्त : भुजंगप्रयात लगागा, लगागा , लगागा, लगागा
काव्यरस