Skip to main content

कविता

करप्शन

लेखक श्रीराम पेंडसे यांनी मंगळवार, 09/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
करप्शन श्री. संदीप खरे यांच्या 'नेणिवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात त्यांची "दाढी काढून पाहिला....." अशी एक कविता आहे. ही कविता ते " आयुष्यावर...." कार्यक्रमातही खूपच प्रभावीपणे सादर करतात. ही कविता म्हणजे माझ्या या कवितेमागची प्रेरणा आहे. आणि म्हणून श्री. संदीप खरे यांची क्षमा मागून ही कविता सादर करत आहे.........

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 09/03/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ... अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ|| अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू अहो धनी चला जोडीनं तण हे काढू अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */ काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही काट्याकुट्यात कशाला फिरता?... अहो काट्याकुट्यात कशाला फिरता? काटं

सुरेश भट यांची अप्रतिम कविता 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' : शब्द हवे आहेत

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 08/03/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्‍याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ? मिळणार्‍या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो. - दिपोटी

न्युड पोर्ट्रेट

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/03/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************************************************** ती आजकाल माझ्याशी बोलतच नाही. कधी कधी माझ्याबद्दल मात्र बोलते... काल विचारलंच तिला... माझी कविता वाचलीस? ................... .......................... तर..... तिच्या कपाळावर या एवढ्या आठ्या..... कपाळावर आलेली बट तिने मागे सारली... जवळ जवळ ओरडलीच..... "आजकाल कसली कसली न्युड पोर्ट्रेट्स काढतोस रे?" मानवाच्या फसकलेल्या नितीमत्तेची... टरकलेल्या चारित्र्याची....

रातराणी

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 08/03/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी सूर्य अस्ताला गेल्यावर, अंधाराच्या साम्राज्यात, प्राणिमात्र विसावतात आपापल्या खुराड्यात ! राऊळे होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे. तुझ्या लालदिव्याच्या माडीचा आसमंत मात्र उजळतो लख्ख, अन रस्ते ओसंडून वाहू लागतात
काव्यरस

जन्मा येण्या कारण तू..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/03/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मा येण्या कारण तू, प्रितीचं अभिसारण तू सारे जीवन फ़ुलवणारी, सुखाची पाखरण तू वसंताचं आगमन तू, कंच हिरवा श्रावण तू सावळ्या नभी फ़ुललेलं, शरदाचं चांदण तू सळसळणारं यौवन तू, निळंजांभळं गगन तू क्षितिजावरती पसरणारं, लोभस सूर्यकिरण तू लावण्याची उधळण तू, नात्यांमधली गुंफ़ण तू अनेक धागे बांधणारं, एक अतूट बंधन तू दु:खाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू गंधभरल्या फ़ुलाफ़ुलांचं, सुंदर मोहक अंगण तू.. शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्‍यातलं चंदन तू भाळावरचं गोंदण तू, नवरत्नांचं कोंदण तू विसवण्या या जगताला गे, मिळालेलं आंदण तू - प्राजु सर्वांना महिलादिनाची हार्दिक शुभेच्छ
काव्यरस

चंदनाचे जीवन

लेखक moghe यांनी शुक्रवार, 05/03/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
चंदनाचे जीवनच असं असते, नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते स्वत: मरत असला तरी, लोकांसाठी जगायचे असते नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं नको असलेली काही नाती आयुष्यभर वागवावी लागतात, आणि मनात जपलेले काही बंध आयुष्यभर अबोलच राह
काव्यरस