Skip to main content

कविता

मैत्री

लेखक गुपचुप यांनी सोमवार, 01/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..
काव्यरस

बेरंग होळी!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 01/03/2010 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
आली रंगीबेरंगी होळी पण झाली आहे महाग पुरणपोळी झाल्या महाग तांदूळ अन डाळी महागाई सर्वांचे कानपीळी रिकामीच आहे सामान्यांची झोळी... आली रंगीबेरंगी होळी पण आहे मनी दहशतीची भिती काळी नेत्यांची राजकारणी खेळी जातो जनतेचा बळी कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?
काव्यरस

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 25/02/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही. सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले: तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?

प्रेमबन

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी गुरुवार, 25/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कळीचे उमलणे, बहरणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे, तीला उमलावे, तीने झंकारुन जावे भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे तीच्या हाती नव्हते, प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने मग तीला सोडुन जावे तीला दु:खात बुडवुन टाकावे भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे तीच्या हाती नव्हते. प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती
काव्यरस

विक्रमादित्याचा पोवाडा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/02/2010 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला.... हो ओ SSSSSSSS पण महाराजा... शेर आखीर शेर होता है...... त्यानं सोडला नाही ठाव..SSS, सोसले..., गुमा SSS न सारे घाव SSS.... लावला नेम, पकडली येळ ..... अन डाव कीं हो साधला ..... जी ई ई SSSSSSS सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न ... राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे.... पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला.... शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे.... राजाच्या सैन्यात हाहाकार...
काव्यरस

चल उसात दंगा करू

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 25/02/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

काव्यरस

लहानपणीच्या सदाबहार कविता - १

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 24/02/2010 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
कविता - मानवी मनाच्या स्रुजन्शीलतेचा कल्पकतेचा एक कलाविष्कार. अगदी लहानपणापासून आपला या कवितान्शी सम्बन्ध येतो. तान्हे बाळ असताना अन्गाईगीत, बडबड गीते यान्च्याअ रूपानी. एकदा शाळेत जायला लागले की मग काय - बालभारती कुमारभारती मधुन पद्य विभागच सुरू होतो. यातील काही कविता निव्वळ ताप किन्वा डोकेदुखी वाटतात. पण काही मात्र मनात अगदी घर करून बसतात - त्यातील गेयतेमुळे, सुन्दर शब्दरचनेमुळे, शब्दचित्रान्मुळे , आशयगर्भतेमुळे. अर्थात हे सगळे बारकावे वयानुसार लक्षात यायला लागतात. पण लहान वयातसुद्धा काही कविता वाचल्याक्षणी आवडून जातात. आपोआप लक्षात राहतात.

वाट पाहणं!

लेखक राघव यांनी बुधवार, 24/02/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं! नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!! कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का? डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :W हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं.. वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं! गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :) आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं.. ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण? इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :) त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं.. राघव

(माझ्या कविता - असा पाऊस पडावा : एक विडंबसुनीत)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 22/02/2010 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
(मी माझ्या कविता इतरत्र कुठेही लिहिलेल्या नाहीत. या माहितीचा वाचकाला काही उपयोग नाही हे माहीत आहे. पण सोचा बताने मे क्या हर्ज है? या कवितेवरून मला खालील ओळी स्फुरल्या. ही कविता वाचून मला टायपिंग नीट येत नसेल असं वाटेल. पण नाही, तो विडंबनाचा भाग आहे.
काव्यरस