Skip to main content

कविता

राणी वै-याची रात्र आहे

लेखक शरद जयकर
सोमवार, 08/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राणी वै-याची रात्र आहे...जागी रहा ! फक्त जागीच नव्हे..जागृत रहा..... सरस्वतीच्या मंदिरात सर्वासमोर जाळली गेलेली रिंकू... भर रस्त्यात चाकूच्या घावांनी तडफडणारी अमृता... टाहो फोडून आकांताने सांगताहेत राणी वै-याची रात्र आहे..जागी रहा... तथाकथित पौरुषाचा डंका पिटणारे भ्याड महाभाग खरतर अधमच.. खून, बलात्कार, जळीत..
काव्यरस

कधी कधी

शुक्रवार, 05/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नभालाही वाटत असेल घ्यावे धरतीला मिठीत कधी कधी ढगांनाही वाटत असेल शिरावे ह्या दरीच्या कुशीत कधी कधी शिखरालाही वाटत असेल खोल खोल दरीत उतरावे अन कधी कधी दरीलाही वाटत असेल उंचावरून जग पहावे कधी कधी पावसालाही वाटत असेल ओलेचिंब भिजावे अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल उबदार गोधडीत शिरावे कधी कधी उन्हालाही वाटत असेल सर्वस्व सावलीला द्याव अन सावल्यांनाही वाटत असेल सोनसळी उन्हात नहाव .. कधी कधी शब्दानांही वाटत असेल कवितेला सजवावे कधी कधी कवितेलाही वाटत असेल शब्दांचेच होऊन जावे..

म्हणून.....

शुक्रवार, 05/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते ! म्हणून..... ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ? नाही, मला काही हौस नाहिये , ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून ! रात्रभर मोगर्‍यातली ती वेणी सोडू? मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे? नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून ! श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू , थरथरत्या तनूला कवेत घेऊ का? न

माझेच होते.....

गुरुवार, 04/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच होते..... हाय ! तुजला जिंकले त्याने जरी , ओठी तुझ्या पण नाव ते .....माझेच होते ! माळू दे त्याला तुझ्या केसांत गजरा , गंधदायी मोगरे.....माझेच होते ! स्पर्शता त्याने तुला जे लाभले , सगळे जुने शहारे.....माझेच होते ! एकही खुलली जरी ना स्मीतरेषा , दाबलेले हुंदके.....ताजेच होते ! अंतरी तुझिया जरी झंकारलो झाकलेले प्रेतही.....माझेच होते !

अंगाई

बुधवार, 03/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
broken image नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे? गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी गोड अंगाई तुला ही रातराणी
काव्यरस

आठवण...(२)

लेखक प्रभो
मंगळवार, 02/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तुला पाहून तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या आवाजावर समाधान मानतोय ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा ती शेअर केलेली कॅडबरी बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा' नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा सगळ्याची आठवण येतेय आजही माझ्याकडे आहे तुझा तो पहिला मेसेज आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट आज तोच शर्ट घालून ऑफिसला जावे म्हणतोय
काव्यरस

कारे प्रिया दूर जाशी,

मंगळवार, 02/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चिम्ब चिम्ब वाटा, चिम्ब चिम्ब झाडे, आसमंती मन होते, चिम्ब चिम्ब वेडे..... वरुण राजा आज कैसा, धरित्रिला कुरवाळितो सोडुनिया आकाश घरटे, प्रिये कड़े झेपावतो..... कारे प्रिया दूर जाशी, अश्या चिम्ब वेळी, दाट धुक्याचे कोंदण माझे, अंग अंग जाळी......... सागर लहरी

आज अचानक...

सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक कातरवेळी, मनी दाटती काजळरेषा वाट चालुनि थकली पाऊले चल साजणा अपुल्या देशा गर्भरेशमी यौवन सरले, शैशव आता स्वप्नचि उरले आठवणींचा खेळ चालला संध्याछाया झाकोळती दिशा सखेसोबती वाट पाहती समांतर वाटा जरी चालती मधुर क्षणांची बकुलपुष्पे अजुनि जागविती मनी आशा पैलतीरी नेत्र लागले स्वप्नांचे आभासही नुरले नको येथले भास मखमली अन परतीची फसवी भाषा.
काव्यरस

मनात माझ्या...

लेखक अजिंक्य
सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या विचार आले, अफाट वेगामधे पळाले, कुठून आले, कुठे निघाले, कळे न काही... मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... मनात माझ्या अनेक वाटा, दिशादिशांना अनेक लाटा, जिथे बघावे नवीन फाटा, कळे न काही... मनात माझ्या विचार आले, सुसाट वेगे नभी उडाले, विहार केला, उडून गेले, कळे न काही...

माझी अगतीकता

रविवार, 31/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...