Skip to main content

कविता

नववधु

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 18/01/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नववधु हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता तोच हात मेन्दीने तेव्हा रन्गला होता नथनीचा तुझ्या त्यावेळी डउलच न्यारा होता गालावरिल लालीचा रन्ग लाजरा होता डोळ्यांमधे निरागसता पराकोटीची जपलेली गोश्ट होती माझ्या प्रेमाची तव ओ लपलेली
काव्यरस

फर्निचर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/01/2010 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले? म्हटले अग सारे नवीनच घेतले लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे अग आमच्याकडे जुने सामान नाही जुने ठेवायला येवढी जागाही नाही तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले लग्नानंतर जागेची मला गरज भासणार सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार? जुने फ़र्निचर!!!

हवे कुणाला...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/01/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
********************************* हवी कशाला रित पुराणी हवे कुणाला प्रश्न नवे... जुनेच अपुले घाव बरे.., अन वर्तमानाचे सुत्र हवे...! हवे कशाला क्षितिज सारे, हवी कुणाला धरा नवी.., तुजपुरती मज चाकोरी बरी, अन तुला जाणीव हवी ...! हवे कशाला पाश जुने... हवे कुणाला स्वप्न सवे, याद तुझी तरीही उरी.., वळुन पाहण्या कारण नवे...! हवे कशाला स्वर्ग साती... जगण्या कुणाला निमित्त हवे, एक तुझी ती मिठी खरी.., सय तुझी अन उरात हवी..! ****************************** विशाल.

थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 14/01/2010 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार कवटाळल्या उजेडाला हाताचा आधार | थेम्ब थेम्ब ओघळून सारे मोती गेले वेदनेच्या सहवासाला सुख भुलले हाताचाच माझिया माझ्यावर वार थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार | किती क्षण सुने गेले किती फुलले अंतरात ओले कधी दंव भिजले प्रेमाचा तो क्षण नेई आयुष्याच्या पार थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार | -- सागर लहरी ०७-१-२०१०

क- कवितेचा

लेखक बाबुराव यांनी गुरुवार, 14/01/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

(छंद दे)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/01/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच!
काव्यरस

आक्रोश...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 13/01/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
************************************* कोपर्‍यात रस्त्यांच्या कलेवर अहिंसेचे... संपले दिवस बापु.., तुमच्या रामराज्याचे आता उरली भयाण केवळ..,शांतता शेवटाची किं गर्भ कोवळे हे उद्याच्या अनावर हिंसेचे? रक्ताने भरली झाडे.., फळे शस्त्रांची... किं पुरावे ते अमुच्या...? कोडग्या मुर्दाडपणाचे ... द्वेषाने बरबटली मने .., वाहले पाट रुधिराचे हे फक्त कोसळणे मानवतेचे ... किं संपणे संवेदनांचे ? ****************************************** विशाल.

सोनपावले ही तुझी...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 13/01/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
सोनपावले ही तुझी... काळे ढग नैराश्याचे होते जीवनात माझ्या. हर्ष घेउनिया आली सोनपावले ही तुझी. होतो एकटा प्रवासी वाटेवरी या जगाच्या. आली वसंत घेउनी सोनपावले ही तुझी. अंधारात या निशेच्या डोळे शोधती प्रकाश. झाली मंगल प्रभात सोनपावले ही तुझी. होतो प्रेमाच्या शोधात मरुभुमीत वैराण. झाले मृण्मयी किनारे सोनपावले ही तुझी.

गवगवा.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 13/01/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
गवगवा..... बघ पुन्हा शब्द आले अन् अर्थ नवा ल्याले अंधारी अडखळता तू तुजसाठी दिवा झाले ! हरवलेला सूर तुझा लोपले संगीतही शब्द तेच , साद तीच दुवा खरी, दवा झाले ! मग बहरलीस तू अशी विसरलीस सहज मला तूच माझे विश्व सखे, तुझे अस्तित्व....वानवा झाले ! ताकद बघ शब्दांची सह्स्त्र लोक गुणगुणले माझ्या भावनांचा पक्षी - एक आपोआप थवा झाले ! आलीस मग परतून तू मन मोरपिशी हवा झाले ऊष्ण तुझ्या अश्रूंचे स्पर्श माझ्या शवा झाले ! शब्द माझे गाऊन तू लोळतेस ऐश्वर्यी संपल्या म्या भणंग
काव्यरस

छंद दे..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 12/01/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दकाळी रात्र सारी, तेवणारा चंद्र दे जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे.. ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे.. नको कोसळ भिजवणारा तापलेल्या भूमिला चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे.. बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू? वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे.. रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे .. मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.. स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे.. - प्राजु