Skip to main content

कविता

झालरी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 21/05/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
झालरी वसने तरूंची मूक त्यांची स्नेहभाषा जाणिवांच्या भावरंगी उन्मनी एकच दिशा जे मिळे तेथेच देई अंबरी पायातही गूढ नाते या चराशी अंतरी हळवी नशा कोष गाभ्याचे कळे ना कोण विणतो साखरी अंशकण मजला मिळावे आळवे निज वैखरी ..............................अज्ञात
काव्यरस

कापला रेशमाच्या सुताने गळा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/05/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
.
.
--------------------------------------------------------
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
.
.

निःशब्द तळ्याच्या काठी

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 19/05/2012 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द तळ्याच्या काठी, रात्रीचे चांदणे झुलते नि:संग फकिरी अवघी, मग कवितेसाठी झुरते... १ नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते.... २ रात्रीस वेध दिवसांचे, दिवसास कूस रात्रीची सजणीचा उसवता श्वास, दिवसाचे सार्थक होते... ३ श्वासास तडे मृत्यूचे, मृत्यूत नभाशी संग मिसळता मीच माझ्यात, श्वासात कस्तुरी भिनते... ४ उःशाप विषादावरचा आकाश सांगूनी गेले भेदून व्यूह मन सगळे कृष्णा सामोरे जाते....५ तुज उशीर झाला सजणे, शब्दांच्या तुटल्या तारा देहात भिनूनी आता, निर्वाण प्रतीक्षा करते.... ६

काकस्पर्श

लेखक रसप यांनी गुरुवार, 17/05/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
नशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली तरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा शेपूट कधी पायात घालून तर कधी हलवत हलवत त्याच्याच मागे मागे फिरणं.. संपलं एकदाचं ते मरत मरत जगणं ! तसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता काळाचं लक्ष वेधून घेण्याचा त्याला जवळ बोलावण्याचा पण त्यालाही कधी वाटलं नाही मान वर करून पाहावंसं मला मुक्त करावंसं.. आणि मी फक्त लाथाच खाल्ल्या... कधी शेपूट पायात घालून कधी हलवून... हलवून... आज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं (म्हणाला असावा - "अरे!

स्त्री मन..

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 17/05/2012 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुसमुसण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके मुसमुसायला?' शिरली अलगद कुशीत माझ्या, लागली हमसाहमसून रडायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, कवटाळून हृदयाशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त चुंबून गालावर, थोपटले जरा कुल्ह्यांवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . .'अग! सांभाळ जरा आपल्या छकुलीला, दुपटे बदल तिचे'..
काव्यरस

निवडुंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 14/05/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रुतल्या कोर-कपारी दारी अगणित वांछा संसारी निवडुंग कुंपणी मी तैसा चाकरी करी खडकाळ तिरी निश्चल काटेरी खोड असे माळल्या विशाखा संभारी राखणे देखणे बहुतांचे अंकीत होतसे सहज उरी निरपेक्ष साधना जन्मभरी जड देह उभा; जळ गाभारी अवकाळहि माझा काळ नसे मी चिरंजीव तव दरबारी ...............अज्ञात
काव्यरस

पफ आणि कस्टर्ड ड्रॅगन

लेखक शुचि यांनी सोमवार, 14/05/2012 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
पफ द मॅजिक ड्रॅगन नावाचे लहान मुलांचे धमाल सुश्राव्य गाणे मध्यंतरी ऐकले. गाणे खूप आवडले. लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी चाल आणि शब्द आहेत. या गाण्यात पफ नावाचा अक्राळ-विक्राळ ड्रॅगन आहे ज्याचे हृदय मात्र लोण्याहूनही मऊ आहे :). मैत्रीमधील निष्ठा आणि कोमल हृदय हे गुण या शक्तीशाली ड्रॅगनमध्ये आहेत. ज्याला मोठे मोठे राजे महाराजे वाकून कुर्नीसात करतात, ज्याच्या गगनभेदी गर्जनेपुढे , थरथर कापून खुद्द समुद्री चाचे आपल्या जहाजाचा झेंडा उतरवतात अशा या ड्रॅगनचा एक लहान मुलगा जिगरी दोस्त आहे. त्याचे नाव "जॅकी पेपर". पफचे, जॅकीवर खूप प्रेम आहे.

जिलब्या टाकतांना... ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 13/05/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ-पीठ:- http://www.misalpav.com/node/21638# नळावर पाणी भरताना पिंप असावचं लागतं, ते नसेल तर मग टमरेलवरही भागतं. आमटीच्या पातेल्यावर पळी असावीच लागते, ढवळतानाही तिला जराशी उलटी धरावी लागते. कधी तिच्या मैत्रिणी भेटतात पलिकडच्या बोळीमधे... उडाणटप्पूला मात्र सगळीकडून ''हँडल''च मिळते बुळबुळीत केळ्यांचे मात्र करावे लागते शिक्रण तसेच तोंडात घातले तर, घडू शकते ''पोखरण''...! हाती लागते नव्या कवींच्या जुन्या कविंचे 'बाड' शब्द चोरुन रचताना अचानक फुटते थोबाड अवास्तव ही जिलबी पलटतो हाती घेवुन झारा तेल जळलं तरी तांब्या फिरतोय गरागरा...
काव्यरस