Skip to main content

कविता

बुगडी माझी सांडली गं या लावणीचे विडंबन

लेखक कान्होबा यांनी रविवार, 01/07/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राने बुगडी माझी सांडली ग या लावणीचे विडंबन केले आहे अर्थात गीतकारांची माफी मागून. महाविद्यालयीन तरुणीला काही विषयात ए.टी.के.टी.

गंध फुलांचा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात नेमकं काय दाटायचं कुणास ठाऊक मला तेव्हा नेमकं काय वाटायचं आतून येणारी हाक त्या हाकेतली आर्त स्पंदनं याचा ठावच घेतला नव्हता मनातल्या वादळाचा तेव्हा अर्थच उमगला नव्हता येणारी हाक कुणाची होती की होते ते फक्त मनाचे खेळ? ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली एक अगम्य, वेडी आशा.....? की अव्यक्त भावनांची हळुवार अमूर्त भाषा? मग जळमटं बाजूला सारून जुन्या कपाटातून काढलीच बाहेर माझ्या आयुष्याची वही तिची पानं थोडी कोरी थोडी भरलेली तुझ्यासमोर ठेवली तेव्हा सारं काही उमगलं बांध फोडून मनात दाटलेलं त्या वहीवर अलगद उमटलं भरलेल्या पानांना तुझ्या अक्षराची सोबत झाली कोरी पानं वाट

" हे माझे पंढरपूर ! "

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/06/2012 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर, घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर | वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर | सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर | कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर | घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||
काव्यरस

आता तू येशील....

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 28/06/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आता तू येशील...हळूच गालात हसशील उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील हळूच चाफा माळताना अलगद लाजशील बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल उडणार्‍या बटांमध्ये जीव माझा भूलेल हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील चटकन लहानाची... मोठी मग होशील वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील बराच वेळ शांत बसून हळूच हसशील लाजर्‍या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील हाय...
काव्यरस

स्थलान्तर करणार्‍या पक्षाला....

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 28/06/2012 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
खाली अथांग पाणी, निळाई संपत कोठे आहे? थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे? समोरचा पाहतो दूरवर, मागचे शिस्तीने रांगी कुठे कधी दिसणार धरित्री, प्रश्न मनीचे मोठे आहे विसरलो केव्हा निघालो, केव्हा टिपिले दाणे चारा हवेचा फक्त खाउनी पिळवटलेली पोटे आहे वादळ वारे घेरुनि येता, विसकटल्या की रांगा थकलेले जीव विसावतिल, आशा ही का खोटी आहे? जे सोडले मागे ते की, जिथे चाललो ते घर अपुले?

गंधार घेतले तू

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 27/06/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या
काव्यरस

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 25/06/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा देखणा देह पेटवी देहात वणवा तिच्या अदा कातिल होई जीव घायाळ तिची रेशमी साडी करे पदराशी चाळा ते चोरटे कटाक्ष होई जीव खुळा उसळे कुंतलाच्या लाटा दर्वळे आसमंत सारा भरकटे गलबत माझे कोठे शोधू किनारा बिघडे श्वासाची लय तिचा धकधकणारा उर ति गौरगुलाबी काया चुंबण्या जीव आतुर

अंगाई मज गाती..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 23/06/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंगाई मज गाती इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती - संध्या
काव्यरस

तीट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 22/06/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित
काव्यरस