Skip to main content

निवडुंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 14/05/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रुतल्या कोर-कपारी दारी अगणित वांछा संसारी निवडुंग कुंपणी मी तैसा चाकरी करी खडकाळ तिरी निश्चल काटेरी खोड असे माळल्या विशाखा संभारी राखणे देखणे बहुतांचे अंकीत होतसे सहज उरी निरपेक्ष साधना जन्मभरी जड देह उभा; जळ गाभारी अवकाळहि माझा काळ नसे मी चिरंजीव तव दरबारी ...............अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1666
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुंदर रचना. आवडली.

खरोखर काटेरी निवडूंग किती तरी काळापासून तप करीत उभा असल्याची प्रतिमा निर्माण झाली. सुंदरच.