Skip to main content

कविता

बंडखोरी...!

लेखक वेणू यांनी बुधवार, 18/04/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
वावरणारा प्रत्येक मनुष्य, एक ठिणगी!! प्रत्येकात एक ज्वाला, खोल आत दडलेली, अवकाश निव्वळ ठिणगीने पेट घेण्याचा, भडका ठरलेलाच! अश्या लाखो ठिणग्या, अवती-भवती वावरणार्‍या... अचानक सगळ्यांनी पेटून उठावं एकेच दिवशी, एकाच वेळी...! मग, ह्या पृथ्वीला, इतर ग्रहांना, आकाशगंगेला- ह्या प्रचंड उर्जेचा भार पेलवेल?? आकाशाची पृथ्वीशी असलेली क्षितीजावरची घट्ट वीण, उसवेल ताडकन! आणि झेपावेल पृथ्वीच, आकाशगंगेबाहेर! तिचा नवा सूर्य शोधण्याकरिता...!! -वेणू वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

सय नाही जात

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 16/04/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
सय नाही जात, गेल्या दिसांची येती न जाऊन जे दिस, मन का पुकारे, त्यांस दिस पाखरू जर असते, पकडून मी ठेविता पाळता त्यांना खुशीने, मोत्यांचे दाणे देता छातीशी जपता धरून प्रतिमा तयांची जरी मी, लपवली नजरेसमोरून हृदयी उमटली मूर्ती, परंतु हटे न हटवून परकेच म्हटले जरी ते गतदिवसांच्या आठवणी विसरता विसरत नाहीत. त्यांचीच कैफियत कवीने मांडली आहे. तो कवी कोण? पाहा ओळखता आला तर! हे मराठी आविष्करण मात्र माझेच आहे. http://anuvad-ranjan.blogspot.in/ "अनुवाद रंजन" या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

परिटघडी...!

लेखक वेणू यांनी सोमवार, 16/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझी साथ आहे" शब्द, शब्दच राहतात, तेव्हा वेदना हेलावते, गोठतात नाजूक भावनाही! चेहरा शांत असला, तरी कोपरा दुखावलेला असतो- आतला!! फक्त असे कोपरे दुमडत जाऊन, मन संकुचित होऊ नये, इतकंच जपतेय.. शेवटी, मनाची 'परिटघडी' जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला कोरेपणा....!! -वेणू ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

(कु)मन....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 15/04/2012 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुख मूका घ्यायला सरसावते आणि त्याच वेळी लपवायचे असतात मला पाठीवरचे व्रण चणे खाऊन, देशी ढोसुन, हवेत विहार करत माझे मन आणि शरीर तयार असते, परत एकदा गटारात लोळण्याकरता.... आणि काही केल्या , चावणे बंद करत नाहीत हे डास, हे ढेकूण ,गटारातील किडे आणि उकीरड्यातुन माझ्या अंगावर येत रहातात ही पिसवे... खातच रहातो मी गटारातील घाण थोडे पोट भरण्यासाठी मेकूड शोधत राहतात माझे हात गाढवाच्या नाकामध्ये एक कच्चा बेडूक सरकवतो घशात, घास म्हणुन, किंवा चकणा म्हणुन देखील पण मेलेल्या कावळ्याला पिसां सकट गिळायला लाळ गाळत असते तोंड बिना दाताचे.. गटारात टाकलेली पाने चावत आणि गिळत. घाणीचे लेप चढतात काखेत
काव्यरस

एक कविता हरवलेली ... सापडली :)

लेखक मस्तानी यांनी रविवार, 15/04/2012 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना. शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित.

!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 15/04/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!! हे नेहमी अस्स्सचं का होतं जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं.. भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ.. Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range 1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change.... दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी' Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'.... 5 रु .

देहबोली

लेखक पेशवा यांनी शनिवार, 14/04/2012 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
तू माझ्या शेजारी आणि घननिळ फुलोरा आहे स्वप्नवेड केसात माळताना स्पर्शाची रेशमधग बाहूतल्या ह्या घुसमटण्याचे हे शब्दनृत्य आहे जिथे भेटलो शरीर द्विपाला कुठल्याशा तुफानासम कोसळलो मीच माझ्यात माझी नाव तिथेच उलटली आहे भरून येता आभाळ चांदण्याने डोळ्यांचे तुझ्या अद्भुतसे नक्षत्र खोल गात्र वेडांचे निळे आकाश कसे फेसाळते आहे! जुळताना ओठांचे दुवे विरघळते अंतरात काही स्पर्शाच्या आरशात बघ सखे एक जीव दुसऱ्यास न्याहाळत आहे दंग गुंफण्यात क्षेत्रे आत्म्याची ही "देहबोली" हुंकार गर्द श्वासांचे हे वेद पारदर्शक भोगवेळी ही 'झदम अदम' वृत्ते मिलनाच्या लयीतली द्वैताच्या ह्या शरीरकिनारी गीत अद्वैती हे कोण गात आहे? अना

रात्र

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यातला चंद्र आणि मनातला अंधार घेऊन सत्याचे भास झेलत स्वप्नांच्या उंबरठ्यावर निद्रेची वाट बघत ताटकळत उभी होती रात्र माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.
काव्यरस

तुझी आठवण येते....

लेखक रसप यांनी गुरुवार, 12/04/2012 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग - भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला दोघां
काव्यरस

सलगी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 12/04/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते .................अज्ञात
काव्यरस