Skip to main content

कविता

रेशिमगाठी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ती व्याकुळ होउन गाते भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची अन् मनस्मरणीवर जपते विस्मरली नावे विरलेल्या शपथांची ती केविलवाणे हसते भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली दंव जसे फिकटते, विरते सुकतात आसवे तशीच थबकुन गाली ती अलिप्त होउन लिहिते कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी वाचून मनाशी म्हणते 'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?' भिरभिरत एकटी फिरते भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी फिरफिरुन रोज सावरते घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी

एक शांत क्षण

लेखक ई-पूर्वाई यांनी मंगळवार, 26/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे, ’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे. ‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे, अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे. घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे, आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे. या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे, अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे. या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे, आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.

पावसाला बोलवायला हवे आता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला बोलवायला हवे आता ------- तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर कोरली होतीस त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या चक्रव्युहात अभिमन्यु झाला होता माझा... ------- अंगणातला पारिजातकही आता फारच काकुळतीला आला आहे तुला आठवतं? पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे . . खरचं पावसाला बोलवायला हवे आता ------- कोसळणाऱ्या धारांमध्ये खिडकीतुन हात बाहेर काढून ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात --------- कुठे दडलाय तो कुणास ठाऊक? --------- नखशिखांत भिजल्
काव्यरस

प्रतिसादांची कविता !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 22/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसादांची कविता !! ‘आवडलेली ‘ कविता फार आवडली ! शेवटची ओळ जास्त भावली ! कल्पना आहे मस्त ! वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त ! ..............." धन्यवाद !!!!" ‘ खूप आवडलेली ‘ Best ! super like !

माणूस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 22/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे न हेवे न दावे, न साठे कशाचे हवेसे नितळ, पारदर्शी उसासे ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी जगाची तमा ना, असे खेळ सारे माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशी .........................अज्ञात
काव्यरस

....बर...!!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 22/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
......बर .....................!! गर्दी जमलीये कसलीतरी बघू बघू काय झालं ... "अगं धरपडशील कुठेतरी मुली …..हो मागं तू ....." ......बर .....................!! बाई मी सांगू ,मी सांगू ... जमलंय मला ….. “आलंय तुला उत्तर तर शांत बस , बाकीच्यांना विचार करू दे जरा ......” ......बर .....................!! व्वा मस्त पाऊस पडतोय सगळे चाललेत भिजायला ....... “हे बघ.... मुलीच्या जातीनं जास्त उंडारु नये ... बस ….वाचत काहीतरी ......” ......बर .....................!! हेही नाटक मीच लिहिलंय ...सर यावेळी एखादा रोल पण करेन म्हणते .... "good good .....

टाळ बोले माझ्य मनीं -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
टाळ बोले माझ्या मनीं नाद करी मृदुंग कानीं चिपळ्यातुनी येई ध्वनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || हाती झेंडा नाचवुनी स्मरण होई गजरातुनी नामाचा जप मुखातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || डोईवरी तुळशीवृंदावनीं पावलांच्या ठेक्यातुनी टाळ्यांच्या तालातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || भक्तीच्या या वाटेवरुनी जाऊ सगळे आनंदुनी गाऊ सगळे दंग होउनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || देहभान अपुले हरपूनी नाचू रंगूया कीर्तनी म्हणू सगळे वारीतुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || .
काव्यरस

निघाली खाशी हो स्वारी ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
निघाली खाशी हो स्वारी दुष्काळी त्या दौऱ्यावरी संगे घेउनिया लवाजमा फौजफाटाही तो भारी तिकडे नाही की पाणी कोरड्याच साऱ्या विहिरी संगे घेउनिया बिस्लेरी ट्रकमधे भारी भारी खाण्याला नाही बाजरी ना दाणा ना भाकरी संगे घेउनिया कारभारी कुशल सैपाकी आचारी डोईवर छत्री ती धरी सोबतचा चमचा कुणीतरी संगे घेउनिया गालीचा पायघडी ती कुणी अंथरी निघाली खाशी ती स्वारी पहा हो विमाने ती वरी संगे घेउनिया सामग्री दुष्काळी त्या दौऱ्यावरी ! .
काव्यरस

नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा , येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक - शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे , पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता ! जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी ऐकू येते डरकाळी शिवबाची नुस्ती सगळीकडे फलकावर झळकणे ध्येय तुजवाचुन नेत्याचे इकडे म्हणतो आहे जो तो येथे, मी शिवबाचा अनुयायी खुर्ची
काव्यरस

'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt . Ltd .

लेखक फिझा यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt. Ltd. * सुख दु:खाचे किरकोळ व घाऊक विक्रेते * मी : हा ....गुड मॉर्निंग मन ...कसं काय रात्री झोप लागली का गोडावून मध्ये ..... मन : हा होय मालक .....पण न्हाई इतकी ..... मी : घे च्या ....दुकानात कसं माणसानं जरा फ्रेश ऱ्हावं ...... मन: होय घेतो की .... गिऱ्हाईक : राम राम शेटजी ... मी :हा ...राम राम ..आज ...काय काम काढलंत ? गिऱ्हाईक : दु :खं द्या जरा नवीन ....... मी : ए मन्या ,,ती भारी दु :खं आन रं इकडं .... हे घ्या ...एकदम बेश्ट माल ..... गिऱ्हाईक : आत्ता कसं .........कितीला हे सगळं .... मी :अडीचशे फक्त !! गिऱ्हाईक : आवं काय सांगता राव .....