Skip to main content

भगोरिया

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 26/03/2013 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
अपरे नाक भृकुटी चाप लघु भाल ,गुलाबी गाल , सिह कटी ,उन्नत वक्ष , गालात खळी ,अपुरी चोळी. फाटके नेसू ,मुखी हासु , वेचते वनबाला ,मोहाच्या फुला, मोहाचा सुटेना मोह,मद्याचे साठले डोह , ढोलक्या ची थाप ,तालात पदचाप . येता सण भगोरिया ,किरात धुंडती प्रिया , जीवाचे करुनी रान ,करिती मद्यपान, प्राशुनी महुवाची दारू ,पळती बैसुनी वारू, घेऊनी आनंद उरी,पळवती तरण्या पोरी. लग्नाची सुंदर प्रथा,नसे चिंता कुणा वृथा. डौलात निघते स्वारी.भिल्लाची रीतच न्यारी.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2716
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

dd gh fd ds मध्य प्रदेशातील झाबुआ भागात आदिवासींचा हा महत्वाचा सण असून हा होळीच्या सुमारास महिनाभर साजरा केला जातो. यावेळी भिल्ल तरूण-तरुणी मेळ्यात मुक्त पणे फिरत असतात. आवडलेल्या तरुणीच्या तोंडात पान घातले, आणि तिने त्याचा स्वीकार केला, तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात... हा संदर्भ ठाउक असणार्‍यांना ही कविता खचितच आवडावी. (मी फार पूर्वी या मेळ्यात बरेच फोटो घेतले होते, ते मिळाल्यास टाकेन, वरील फोटो जालावरून घेतले आहेत).

In reply to by चित्रगुप्त

@तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात...>>> हे शाम मानवांच्या भाषणात आंम्ही एकदा ऐकलवत.त्यामुळे वाचताना अंदाज आला.आणी पान भरवतानाच्या फोटूंमुळे पुरावाही मिळाला. ;-)