Skip to main content

रंगुनी रंगात मधुर.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 27/03/2013 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............ दिन रंगांचा आजला कल्लोळ भावनांचा उरी, रुसलीस तू, खुलवींन मी आज उधळूनी रंग तुजवरी !. विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा ! विविध रंग घेउन सवें पोहोचलो द्वारी तुझ्या, बावरली तू गोड अईसी फुलले गुलाब गालीं तुझ्या ! ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा, स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली, रंगांची मुक्त उधळण अशी नव्हती कधी मी ल्यायली ! मुक्त रंग तव लावण्याचे ह्या परी कधी ना पाहिले निस्तब्ध जाहल़ो इतुका उधळण्याचे रंग तुजवर, हाती तैसेचि राहीले ! ! ! निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1646
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा !
ये बात!