Skip to main content

भेटलाच कधी.....

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 24/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......। "भक्ती" म्हणजे काय असते ? देवाचे स्वरुप हे चरचरात असते कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥ भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......। "ज्ञान" म्हणजे काय असते ? सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥ भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......। "वैराग्य" म्हणजे काय असते ? सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥ भेटलाच कधी शिवाजी तर विचारा त्याला....। "सामर्थ्य" म्हणजे काय असते ? प्रजेच्या दुखःची जाणीव अंतरी झाली यवनांशी युध्द करून स्वराज्याची स्थापना केली ॥ भेटलीच कधी अनुसया तर विचारा तिला....। "पातिव्रत्य" म्हणजे काय असते ? सत्व बघण्यासाठी तिन्ही देव आले होऊन बाळ्के तिची तिच्याच घरी खेळू लागले ॥ भेटलीच कधी द्रौपदी तर विचारा तिला....। "श्रध्दा" म्हणजे काय असते भरसभेत जेंव्हा सर्वांनी मान फिरवली पुकारताच श्रीकृष्णाला त्यानेच तिला वस्त्रे पुरवली ॥ भेटलीच कधी शबरी तर विचारा तिला....। "सबुरी" म्हणजे काय ससते ? श्रीरामाची वाट बघण्यात आयुष्य घालवले भेट दिली श्रीरामाने जन्म मरण चुकविले ॥
लेखनविषय:

वाचने 1241
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया