अर्घ्य
झळ उन्हाची येते लेवून
गतकाळातील 'आठवकळा'
ते दिवस नेटके होते
अन रात्री उलगडलेल्या...
मी तुला, तू मजला ...
हलकेच पुन्हा आठवतो
विस्मृतीच्या क्षणांसाठी
कण कण साठवतो ....
हळुवार पुन्हा मी हसतो
त्या हसण्यावर ती रुसते
बट केसांची नकळत,
त्या गालावर रस्ता चुकते
तो थेंब चिंब ओलेता ...
हलकेच चुकार ओघळतो
मी शुष्क कोरडासा,
तो मला भिजवूनी जातो
प्राजक्त कधी परसातला
खांद्यावर ठेवतो डोके
दरवळताना जाई-जूई,
हळुच घेती व्याकुळ झोके
तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा
हृदयाशी गुजगोष्टी करतो
विसरताना मी तूला,
आठवांचे 'अर्घ्य' देतो .
विशाल
काव्यरस
मिसळपाव
शब्दाने वाढला शब्द
कडाक्याचे भांडण झाले
मी सुन्न आणि स्तब्ध
अन, ती निघून गेली
न मागे वळून पाहणे
न माघारी ते फिरणे
वादातून तुटला धागा
आता उरले ते झुरणे
मी आशा का ठेवावी?
की जीवनी असेच व्हावे
साथ ही सुखाची
नेहमी मनाजोगे घडावे
ती निघून गेली आता
तिच्या एकल्या मार्गाने
कोमेजून गेली स्वप्ने
मी व्याकुळ इथे विरहाने
भेटेल कुणी कधी तिला
तो मार्ग चालता चालता
दाटूनी कंठ माझा आला
मज काही न ये बोलता
आता माझ्याही नशिबी
हे थ
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
विटलेला रंग कचर्याचा गंध
ना घुशींना प्रतिबंध.
कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा
लाभला उंदरांस स्वच्छंद!
मी आशा का ठेवावी?
की कबुतरांना शी न व्हावी!
वैतागून संध्