Skip to main content

कविता

मौनात दडले क्रौर्य

लेखक गणेशा यांनी बुधवार, 11/02/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ
काव्यरस

नेमक काय चुकतंय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 11/02/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय, तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय, पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो, अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो, जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या, नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो, तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो, जेव्हा ती हि हसते गालात हळूच, नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो, कुठेतरी फिरवावं हिल
काव्यरस

वैभवशाली वाडा जुना

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 11/02/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्व

क. सांगता येत नाही

लेखक जातवेद यांनी सोमवार, 09/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
असो. आता या पुलाखालचं नुस्तं पाणिच काय अख्खा पुल वाहून गेल्यात जमा झाला आहे कदाचित कोरड्या प्रवाहामुळेपण पुल पडत असतो अशा ह्या विचित्रपणाचा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय म्हणलं ठिकाय, आपण आता नविन पुल बांधुया ठरलं तर. पण नविन पुल बांधायचा कुठे जुन्या पुलाचा पाया तर काढता येत नाही तसही इथे पाणि कुठाय?

दोस्ताना!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/02/2015 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक पुस्तक दिसल... 'एका मैत्रीची कहाणी'... नाव होत.. 'मैत्री'त कहाणी कशी असेल? 'कहाणी'तली मैत्री कशी असेल? कुतूहल माझ जागं झाल... पुस्तक माझ्या घरी आल! तेवढ्यात पक्या घरी आला... दोस्तीची 'आण'देऊन पान खायला घेऊन गेला... 'साल्या तुझी तंगी हाय? दोस्त न तुझा? सांगायच नाय?' जीव आत कसानुसा झाला... 'याला कोणी सांगितल?' प्रश्न मनात आला... मुलांची फी.. आईच् आजारपण.. बायकोची नोकरी गेली... राहाते राहिलो कमावते आपण.. पैसा पूरा पडेना... आयुष्यच तंग.. काहीच मला बोलवेना... उलाघाल मनाची... दोस्ताला कळली... 'तू नाही बोललास... काल आई भेटली... साल्या दोस्ती आपली फार जुनी हाय.. तुझ्यामुळे बुकं शिकलो..

गलित आहे गात्र अजुनी

लेखक चिमिचांगा यांनी शनिवार, 07/02/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

खरी कविता..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 07/02/2015 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या खर्‍या कविता..म्हणुनी शब्द कल्पना सांगत नाही. येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?) अश्या कुठे त्या.. थांबत नाही. बोलावुनी वा हाकारुनी त्या ढुंकुन कधिही पहात नाही. आणि घेतले टाळे लावुनी येणे-असता.. रहात नाही. बासरी ,पुंगी..नाद कसाही निश्चित त्यांचे स्वरूप नाही. किंवा स्वये त्या नाद-घेऊनी येतील..त्याचे अप्रुप नाही. वार्‍या समं ते शब्द वाहती कवेत त्यांना घेता..
काव्यरस

नेहेमीची गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 07/02/2015 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
'Don't take me for granted'; तिने दम दिला 'अग? पण मी कुठे?' त्याने केविलवाणा प्रयत्न केला 'माहिती आहे मला तुझा स्वभाव... मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव; एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..' चिडून गेली ती आत तणतणत! कस सांगू हिला.. surprise आहे! तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे! एक गजरा... एक नाटक... नंतर long walk चा plan आहे... तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे... खरच आवडतेस ग मनापासून; विसरभोळा आहे घे सांभाळुन; संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे... अस आपल् म्हणायच... खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे....
काव्यरस

कुमारी मैत्री विश्वास आठवणी

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 06/02/2015 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली ऑफिसची वेळ; नव-याचा डबा... पोरांची शाळा; boss चा चेहरा.. आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े... थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली... निघून गेली दुसरीकडे... जाणवल तिच हिरमुसण फुगण... पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली.. ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती; मी हसले...

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 06/02/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१ मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.