Skip to main content

कविता

पिक्चरगाथा ('टॉरेंटगाथा'वरून प्रेरित)

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 30/01/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी -अपूर्व ओक डिस्क्लेमरः कवितेत व्यक्त झालेले शब्द, भाव व अर्थ काल्पनिक असून कव

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 30/01/2015 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट

स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 29/01/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता ||धृ|| हक्क कितीक आले आरक्षणेही आली आणि वेगळेपणाची मग लक्षणेही आली गर्दीत पुरुषांच्या कोंडतो श्वास येथे एकटेपणात होतो भलताच भास येथे शोधता स्नेह नयनी दिसतेच भूक आता कळपात श्वापदांच्या गत होई जी हरणाची होते तशी अवस्था अन भीती ही मरणाची एकही भला चेहरा ना वाटतो आधार सर्वांसमक्ष येथे घडतोही अत्याचार सगळा समाज वाटे झालाय मूक आता प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता - अपूर्व ओक
काव्यरस

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 29/01/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा .. निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा .. गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा .. भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा .. .
काव्यरस

पाऊस आठवणींचा…

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 29/01/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक पाऊस आला, सगळ्यांनाच भिजवून गेला… एवढी कसली घाई होती बाबा, हिवाळ्यातच पडून गेलास… बरं येताना तू एकटा कधी येत नाहीस, सोबत तिच्या आठवणीही घेऊन येतोस… तू आपला पडून जातोस, आणि मला मात्र कासाविस करतोस… घरातच बसून मी बाहेर तुला पडताना पहात राहतो, तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबात मला तिचाच चेहरा दिसत राहतो… कधीतरी कडाडणाऱ्या विजेसोबत मी नक्षी आठवणींची विणत राहतो, अश्याच कुठल्यातरी जुन्या पावसात मग मी देखील हरवून जातो… तेव्हा देखील तू असाच यायचास कोणालाही न सांगता, मग मी ही निघायचो तिच्याकडे कुठेही न थांबता… मग आम्ही दोघंही भिजत राहायचो तू थांबेपर्यंत, अरे!

हृदयाचा फोन

लेखक महेश अशोक खरे यांनी मंगळवार, 27/01/2015 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
काव्यरस

निंगे सासरी ...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी मंगळवार, 27/01/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
निंगे सासरी नवरी मनी फाटलं अभाय नोता निंगता निंगत कसा घरातुनं पाय १ भिरं भिरं लानं भाऊ फिरे तिचया पाठी मांगं घळी घळी पुसे तिले आजं कुठी जातं सांगं २ केला साजं शिनगारं जशी लक्षमी नटली जाता माय बापा जोळं घऴी डोयाची फुटली ३ टाके दमनीतं पायं डोया पाये घराकळे फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले ४ उभी आंगनात मायं हाती डाबलं कुकाचं टाके खुरावरं पानी डोयातलया आसवाचं ५

सामंत

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 22/01/2015 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
'गांधी येडा होता रे' सामंत नेहमी म्हणतो आणि मग फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल... असं कायकाय बोलत राहतो दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो 'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो. सामंतला ब-याच गोष्टींबद्दल माहिती असते ....वरवरची आणि माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सामंत 'अमेरीकेचा गेम आहे सगळा' असं म्हणतो अमेरीका नक्की काय करते ते त्यालाही माहिती नसतं पण त्याने त्याला काही फरक पडत नसतो खरंतर, कुणालाच काही फरक पडत नसतो कारण 'अमेरीका गेम करते' म्हणल्यावर सगळे माना डोलावतात. सामंत बोलतो... माहिती असो वा नसो ...सामंत बोलतो आणि बेधडक आप

(सोबती) सकारात्मक.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 22/01/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुचेता ह्यांची सोबती ही कविता वाचली आणि आवडलीही. तसं पाहिलं तर काव्य करणं हा माझा प्रांत नव्हे. पण मधेच कधीतरी सुरसुरी येते. सुचेता ह्यांची 'सोबती' कविता वाचली आणि आलेल्या सुरसुर्‍या अवस्थेत एक कविता होऊन गेली. तुम्हा सर्वांच्या आस्वादार्थ...... सुखाला अनंत सोबती जरी, दु:खातही तुम्ही एकटे नसता, मित्र असतो सोबतीला, सगळेच कडेने पोहणारे नसतात. ज्याचं त्याने सामोरं जावं, प्राक्तनाला दोषी का धरावं? जीद्द अशी बाळगावी, दैवानेही समोर झुकावं. अरे हेच चिरंतन सत्य आहे, पाठ फिरवून पळायचं नसतं. संघर्ष जो सदैव करीतो, दैव त्यालाच प्रसन्न होतं.