मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला

टवाळ कार्टा · · जे न देखे रवी...
कविवर्य "विकु" यांची मापी मागून…आणखी येक जिल्बी :D पेर्णा - http://www.misalpav.com/node/29907 --------------------------------------------------------------------------------- मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला मित्रालाच सांगतो, (थोडी) पीत जा... असा मी बेवडा दांभिकांची छुपी जागा, जातिवंतांस सोहळा ढेकूण नामे किटक डसतो, बारवाल्याचा वायझेडपणा "पक्षी" देतो प्राण येथे, आणे वेटर बावळा भाव न जाणता (जो) सोनेरी रंगा भुले वर्ण असो गोरटा मग होई काळा सावळा तारवटलेल्या डोळ्यांनी देशी जो घेतो पिउनी घास उदरीचा ओकतो तो, होय मोठा सोहळा मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला "रम"लेले म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा? घाबरत नसें या जगा इतका पिल्यावर तू सांग त्यांना ढोसूनी, समजू नका मला बेवडा ! फक्त : काल"खंबा" "चाल"वली : एक पाय पुढे दोन पाय मागे … एक पाय पुढे दोन पाय मागे (सर्वत्र "स्वयं"प्रकाशित) ओशाळ

वाचने 5019 वाचनखूण प्रतिक्रिया 15

मदनबाण Wed, 01/07/2015 - 11:46
पहिल्या प्रतिक्रियेशी सहमत... ;) बाकी व्हिस्की,रम, ब्रांडी यात काय फरक असतो ? या प्रत्येकात किती अल्कोहलच प्रमाण असतं ? यातले प्रत्येकातले नामांकित ब्रांड कोणते ? महागडे आणि खिशाला परवडणारे यात नक्की चांगले कुठले ? या प्रश्नावर प्रबोधन करुन हवे आहे....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)

In reply to by विवेकपटाईत

टवाळ कार्टा Wed, 01/07/2015 - 22:36
बाकी जील्बीत गोड आणि स्वादिष्ट बारबाला दिसली नाही
माझ्या मिपा आयडीला हार घालायची वेळ येईल :( (स्वगत - अजून दुसरा ड्वैडी पण नाही घेतलाय ;) )

गवि गुरुवार, 01/08/2015 - 12:10
त्या जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप असा मिश्र स्वाद लोक्सना का आवडतो हा प्रश्नच आहे. की केवळ बजेटसमस्या ?! ;)

In reply to by गवि

टवाळ कार्टा गुरुवार, 01/08/2015 - 12:16
जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप असा मिश्र स्वाद
काहिंना टेकऑफ्फ (मैफिलीतून आणि जीवनातून सुध्धा) करायची घाई असते त्यामुळे असे जेट फ्युएल भरत असतील

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 01/08/2015 - 12:23
सहमत... मोजून २ वेळाच जुन्या संतांची जीभ-भेट झाली. आता तिसरी भेट तर अजिबात नाही...