"अर्थ"
शब्दांत गुंफले मी
हळुवार जाणिवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||धृ||
मज स्मरणात आज ही रे
ती संध्या भारलेली
संग लाभला तुझा अन
काय माझी मोहरली
जणू चैत्र वणवा विझावा
वळवाच्या सरींनी भिजताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||१||
हे बंध जे जगाचे
पायात घोळणारे
माझी अबोल प्रीती
जणू भिन्न दोन्ही किनारे
दिसतो तुझाच चेहरा
माझे प्रतिबिंब पाहताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..
काव्यरस
मिसळपाव