झळ उन्हाची येते लेवून
गतकाळातील 'आठवकळा'
ते दिवस नेटके होते
अन रात्री उलगडलेल्या...
मी तुला, तू मजला ...
हलकेच पुन्हा आठवतो
विस्मृतीच्या क्षणांसाठी
कण कण साठवतो ....
हळुवार पुन्हा मी हसतो
त्या हसण्यावर ती रुसते
बट केसांची नकळत,
त्या गालावर रस्ता चुकते
तो थेंब चिंब ओलेता ...
हलकेच चुकार ओघळतो
मी शुष्क कोरडासा,
तो मला भिजवूनी जातो
प्राजक्त कधी परसातला
खांद्यावर ठेवतो डोके
दरवळताना जाई-जूई,
हळुच घेती व्याकुळ झोके
तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा
हृदयाशी गुजगोष्टी करतो
विसरताना मी तूला,
आठवांचे 'अर्घ्य' देतो .
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3564
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छान आहे
"तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा
हृदयाशी गुजगोष्टी करतो
विसरताना मी तूला,
आठवांचे 'अर्घ्य' देतो ."
एक नंबर
धन्यवाद
धन्यवाद :)
मस्त मस्त
छान कविता
तो थेंब चिंब ओलेता ...
तो थेंब चिंब ओलेता ...
हलकेच चुकार ओघळतो
मी शुष्क कोरडासा,
तो मला भिजवूनी जातो
मस्त कविता, गतकाळाची आठवण ..
खूप छान
हळुवार कविता!
आभार्स विवेकजी आणि तैबै
आभार्स विवेकजी आणि तैबै :)
मस्त कविता.. एकदम छान लिहिली
मस्त कविता.. एकदम छान लिहिली आहे
तरल
हळुवार कविता. आवडली
धन्यवाद
धन्यवाद :)
वाह!
मिपावरील ही पहिली कविता आहे जिची वाचनखूण मी साठवली आहे. बर्याच उशिराने पाहिली. सुंदर!
_/\_
In reply to वाह! by एस
_/\_