Skip to main content

तुझी आठवण

लेखक माहीराज यांनी सोमवार, 14/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे पाहताना मी तुला चांदणे ही बावरे का असे भास होती वेड्या मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1462
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। ... हे खूपच छान लिहिले आहे.

छान