..वॉन्टेड..

लेखनविषय:
उगा हासरा तुझा चेहरा! भरपूर झाला इथे आसरा उजेडात आला जुना कोपरा पायात रडला पुन्हा उंबरा उत्क्रांत झाला किती वानरा !! झालास तू ही बैल वासरा !! वॉन्टेड आहे तू ही ईश्वरा! पत्ता तुझा दे एक अंबरा! दिसलाच अंती मूळ चेहरा! झाकुन घे तू डाग पांढरा तोडुन गेली गाय आसरा दुष्काळ आहे परत पाखरा फिरतोच आहे अजुन भोवरा उघडाच आहे सोड पिंजरा! अंधार गेला नीघ भास्करा! बोलुनि गेली काय मंथरा? वनवास आहे थांब उत्तरा! जवळुन गेला हाय मोगरा गाऊन जा तू फक्त अंतरा! मुलगाच आहे मार शंकरा! मृत्यु असावा खास सोयरा! - कानडाऊ योगेशु

एकट्याने रात हि पेलावी कशी

लेखनविषय:
एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने मंतरले मन एका विदेही स्पर्शाने क्षणांची माया हि तोडावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी लागता लागेना काळजाचा ठाव दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव धुक्यातली वाट हि चालावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी उधाणली स्वप्ने भावनांना पूर दिसेना काठ कुठे डचमळे ऊर हृदयाची नाव पार लागावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

पहाट बोले …

लेखनविषय:
आली पहा ती रम्य पहाट पक्षी करिती किलबिलाट कोकिळ घाले मधुर साद; केशर रंगी रविकिरणे शीतलता ही प्रसन्न करे पर्णांना सोनेरी वर्ख चढे; दावुनी अपुली किमया ही काय सांगू पाहते ती? “हार नका मानू कधी!” “तम हा सरला, उठा सारे, चैतन्याचा प्रकाश पसरे, कर्तृत्वाचे रचा मनोरे!” – उल्का कडले

असा कसा काळ आला

लेखनविषय:
काव्यरस
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरं बोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला माणूसच कूठे गहाळ झाला भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३

वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे. ------------------------------------------ गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर उघडाबंब मी.. शार्कच्या नजरेप्रमाणे.. कपड्यांना चिकटलेली.. नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना... "अहो जास्त पुढे जाऊ नका. तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..." असा डायरेक्ट आत्म्याशीच संवाद साधणारा आवाज येतो...! ती तूच असतेस. समुद्राच्या पाण्यात तू अलगद अंदाज घेत उतरतेस.... एक एक पाऊल पुढे टाकत..! अन पावलागणिक ओले होणारे तुझे अंग पाहत... मी स्तब्ध राह्तो...! अन मग हळुहळू त

कस सांगु ???

लेखनविषय:
प्रिय बायको... कस सांगु??? माझ्यासाठी कोण आहेस तू तू झुळुक हळुवार हवेची तू सांज रिमझिम सरीची मी अलगद मदहोश होतो अशी तू धुंद कळी निशिगंधाची तू एक ओढ़ हवीहवीशी तू एक नशा अनिवारशी मी नकळत हरवत जातो जेव्हा चाले जादू तुझ्या डोळ्यांची तू क्षितिज माझ्या स्वप्नांचे तू आभाळ माझ्या विश्वाचे मी घेतो भरारी तुझ्या पंखाने तू घरपण माझ्या घराचे जरी भेटे रोज, तरी नवी तू नको जग सारे, फ़क्त हवी तू माझ्या अस्तित्वास अर्थ तूझ्यामुळे या खरचं कस सांगु??? की माझ्यासाठी कोण आहेस तू तुझाच जबरा Fan नवरा

निर्णय

लेखनविषय:
तू विचारशील आईबाबांना सांगितलेस का? तेव्हा म्हणेल काळजी नको त्यांना मी पटवतो तू म्हणशील मला त्यांना भेटायचे आहे तेव्हा म्हणेल मला तर मनभरून भेट त्यांना लवकरच भेटवतो . हात धरेल किस करेल भेटताच मिठी मागेल तुझ्याशिवाय जगात कुणीच नाही अगदी असाच वागेल तो म्हणेल आता सहन होत नाही संपूर्ण भेट व्हावी तुलाही वाटेल कित्ती प्रेम आहे प्रेमात दूरी नसावी .

मन

लेखनविषय:
काव्यरस
मन धावून धावून जातं आणि बिलगतं - पानाफुलांना, वृक्षवेलींना, रानवाटांना, डोंगरदऱ्यांना. मन पंख उघडतं आणि झेपावतं त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात; आणि तरंगत, उमलत राहतं एखाद्या शुभ्र मेघासारखं. मन चांदण्यात जाऊन बसतं आणि अबोल रात्रीला पुसतं तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं. मन वहिवाट सोडतं आणि निघतं त्या वाटेने ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत, दिशा आणि देशांचे फलक नाहीत; जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !
Subscribe to कविता