Skip to main content

निर्णय

लेखक तुषार जोशी यांनी गुरुवार, 28/04/2016 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
तू विचारशील आईबाबांना सांगितलेस का? तेव्हा म्हणेल काळजी नको त्यांना मी पटवतो तू म्हणशील मला त्यांना भेटायचे आहे तेव्हा म्हणेल मला तर मनभरून भेट त्यांना लवकरच भेटवतो . हात धरेल किस करेल भेटताच मिठी मागेल तुझ्याशिवाय जगात कुणीच नाही अगदी असाच वागेल तो म्हणेल आता सहन होत नाही संपूर्ण भेट व्हावी तुलाही वाटेल कित्ती प्रेम आहे प्रेमात दूरी नसावी . तुम्ही दोघे एक व्हाल त्याच्या मित्राच्या खोलीवर तन मन धुंद होईल प्रितीच्या देह बोलीवर त्यानंतर तुला कळेल तो खरा आहे कसा देहाची किंमत देऊन मिळेल तुला आरसा . तो सांगेल आईबाबांना तू पसंत नाहीस ते माझ्यासाठी बघताहेत दुसरी स्थळे काही तो सांगेल माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी आई बाबांना दुखवू शकत नाही . तो असाच अधिर असतो तुला मिळवण्यासाठी एक होताना आई बाबांची परवानगी लागत नसते नंतरचे निर्णय समाजाचे आई बाबांचे असतात म्हणूनच नातेवाईकांच्या (देवाब्राह्मणांच्या) साक्षीची प्रथा असते . सगळ्यांच्या साक्षीने देह द्यायचा की गुपचूप हा निर्णय तुझा आहे तुलाच आहे ठरवायचा त्याला फक्त तो एक क्षणच हवा असेल कदाचित तुझ्यासाठी असेल तो निर्णय तुझ्या आयुष्याचा . तुष्की नागपुरी नागपूर, ३० मार्च २०१६, ०८:००
लेखनविषय:

वाचने 651
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया