आली पहा ती रम्य पहाट
पक्षी करिती किलबिलाट
कोकिळ घाले मधुर साद;
केशर रंगी रविकिरणे
शीतलता ही प्रसन्न करे
पर्णांना सोनेरी वर्ख चढे;
दावुनी अपुली किमया ही
काय सांगू पाहते ती?
“हार नका मानू कधी!”
“तम हा सरला, उठा सारे,
चैतन्याचा प्रकाश पसरे,
कर्तृत्वाचे रचा मनोरे!”
– उल्का कडले
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1170
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे...
धन्यवाद!
In reply to छान आहे... by विजय पुरोहित
वर्ख म्हणजे काय?
In reply to धन्यवाद! by उल्का
मुलामा. मिठाईला चंदेरी थर
In reply to वर्ख म्हणजे काय? by सुरवंट