मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा कसा काळ आला

gsjendra · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरं बोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला माणूसच कूठे गहाळ झाला भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

वाचने 940 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कानडाऊ योगेशु 30/04/2016 - 19:27
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला
ह्या दोन ओळीत षटकार मारला आहे. गझलेच्या शेराची जातकुळी आहे.