कस सांगु ???
लेखनविषय:
प्रिय बायको...
कस सांगु??? माझ्यासाठी कोण आहेस तू
तू झुळुक हळुवार हवेची
तू सांज रिमझिम सरीची
मी अलगद मदहोश होतो
अशी तू धुंद कळी निशिगंधाची
तू एक ओढ़ हवीहवीशी
तू एक नशा अनिवारशी
मी नकळत हरवत जातो
जेव्हा चाले जादू तुझ्या डोळ्यांची
तू क्षितिज माझ्या स्वप्नांचे
तू आभाळ माझ्या विश्वाचे
मी घेतो भरारी तुझ्या पंखाने
तू घरपण माझ्या घराचे
जरी भेटे रोज, तरी नवी तू
नको जग सारे, फ़क्त हवी तू
माझ्या अस्तित्वास अर्थ तूझ्यामुळे या
खरचं
कस सांगु??? की माझ्यासाठी कोण आहेस तू
तुझाच जबरा Fan
नवरा
वाचने
1471
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
"कैसे बताऊ मै तुझे" आठवले नानाचे पण ही भावना सच्ची आहे.
आवडले.
सही पकडे है........अभ्या जी
अश्याच काहिश्या मुड मधे लिहिली आहे.
mast livlay!
मस्त रे अमल्या...
सोडून गेलीय का?
जोक्स अपार्ट, कविता ठिकठाक वाटली. एवढी पण काही खास नाही.
In reply to सोडून गेलीय का? by सुरवंट
पुढल्या वेळेस
बघू
चांगला अजुन चांगला प्रयत्न करीन
मस्त रे अमल्या!!!
सर्वाचे आभार
"कैसे बताऊ मै तुझे" आठवले