मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आस

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
बांधावरचा पिंपळ सांगे सोनसावळी दुःखे ओली फांदी-फांदी जीर्ण पर्णिका बांडगुळांची गर्दी सगळी अस्ताईचे सूर अनोळखी शुष्क पान्हा हळवी देवकी कशी रुचावी जगण्यालाही अस्थाईविन बंदिश पोरकी सुकली पाने सुकली माती खिन्न विरहिणी होय पालवी पाणी सुकले बुंध्यापाशी त्राही त्राही अंकुर डोकावी कधी अकस्मित ओल मुळांना कधी मेघांचे हळवे चुंबन लागे जलदांना ओढ भूमीची कधी अचानक अधीरे मिलन नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ? सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो विशाल १०-०५-२०१६

..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४

कानडाऊ योगेशु ·
तशी तू देवभोळी नाहीस पण नास्तिक नक्कीच नाहीस..

आखाजीना सन

पाषाणभेद ·
काव्यरस
खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा - नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात) झोका टांगेल शे दारात आंबानं पान हिरवंगार झोका जावूदे जोरदार गवराई चला ग मांडूया पुजा तिची करूया आखाजीना सन शे माहेराला बरकत दे माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले सासर मधार सुख दे (अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या) - पाभे

आखाजीचा सण

पाषाणभेद ·
काव्यरस
गवराईचा सन आला गवराईचा सन आला या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही - पाभे

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप ·
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

....थांबले ट्राफीक आता...

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
थांबले ट्राफीक आता. माग लवकर भीक आता. शांततेचा पॅक्ट झाला वाढले सैनीक आता जा पुरा व्यवहार झाला तुझि नको जवळीक आता! लग्न झाले..ते हि झाले चांगले सोशीक आता.. दु:ख झाले भोगुनीया हासणे ऐच्छिक आता.! (प्रश्न झाले मांडुनिया उत्तरे ऐच्छिक आता!) लागु केली कर्जमाफी काढ लवकर पीक आता! उंच त्याचा भाव नेला वाढले भावीक आता...! विसर सारे शीकलेले एवढे तू शीक आता चेहरा सभ्य दिसावा शिकुन घे ही ट्रीक आता. हा लढा अंतिम आहे फक्त थोडे टीक आता - कानडाऊ योगेशु

माय

ऊध्दव गावंडे ·
लेखनविषय:
माही माय माही माय नाई शिकली लेयनं रातं दिसं मेहनतं जीवं मातीले जायनं चुरुक भुरुक अशी लावे झाकटीतं रई देते पाह्यटीचं मले खायाले सायी चं दई ठूनं हातावरं डोक्सं तिचं वगारु पाजनं शाळेतल्या पोराईचं यकं दोनं आईकनं चुनं भाकरं थापूनं घाई घाई वावरातं कापूस येचता येचता जोळे नख्ख्याईशी नातं सोसून सासरवासं तरी राये समाधानी पोरं शिकतीलं लयं सदा राये ह्याचं ध्यानी दुध तपवूनं राती टाके त्यातं इरजनं व्हते दई,लोनी चं ते नाई नासलं आजुनं

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

कानडाऊ योगेशु ·
..तुला पाहण्याचा मला छंद राणी.. दिव्यांना नको तू करु मंद राणी तुला पाहण्याचा मला छंद राणी पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी मला घे मिठीच्याच कैदेत आणि नको गे करु तू खुले बंध राणी तुला मी मला तू असे प्राशवावे.. पुरी रात व्हावी मधू धुंद राणी.. तुला लागला सावळा रंग माझा तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी - कानडाऊ योगेशु

आधी सोसायचे ,मग हासायचे

पथिक ·
लेखनविषय:
आधी सोसायचे ,मग हासायचे आधी रुजायचे, मग फुलायचे स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे खेळ मांडायचे, जरी मोडायचे मांडणे-मोडणे, एक मानायचे तारे माळायचे, नभ नेसायचे आपलेच रूप, मग बघायचे वाट चालायचे, तुला शोधायचे स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

माहितगार ·
लेखनविषय:
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?