मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माय

ऊध्दव गावंडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माही माय माही माय नाई शिकली लेयनं रातं दिसं मेहनतं जीवं मातीले जायनं चुरुक भुरुक अशी लावे झाकटीतं रई देते पाह्यटीचं मले खायाले सायी चं दई ठूनं हातावरं डोक्सं तिचं वगारु पाजनं शाळेतल्या पोराईचं यकं दोनं आईकनं चुनं भाकरं थापूनं घाई घाई वावरातं कापूस येचता येचता जोळे नख्ख्याईशी नातं सोसून सासरवासं तरी राये समाधानी पोरं शिकतीलं लयं सदा राये ह्याचं ध्यानी दुध तपवूनं राती टाके त्यातं इरजनं व्हते दई,लोनी चं ते नाई नासलं आजुनं

वाचने 1819 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चांदणे संदीप 08/05/2016 - 17:26
आईसाठी आलेली सुंदर कविता! अवांतर: जव्हेरभौंच्या प्रतिसादावरून सुचलेली गंमत : कविता सुरूवातीला गडबडलीये... थोडी मध्ये मध्ये भरकटलीये आणि शेवटाकडे जाताना संपूर्ण गंडलीये. बाकी कविता उत्तमच!!! टीप : ही फक्त गम्मत आहे! ;) Sandy

ऊध्दव गावंडे 10/05/2016 - 00:08
धन्यवाद! जव्हेरगंज जी. अजुन सविस्तर समजले तर आपला आभारी राहीन. जेणे करुन मला सुधारणा करणे सोयीचे होईल. प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद. तसेच चांदणे संदिप व अभ्या(अभ्या असं संबोधण्यात संकोच वाटतो) यांचा सुद्धा आभारी आहे. आपणां सर्वांच्या सविस्तर सुचनांचे प्रतिक्षेत!

गणेशा 10/05/2016 - 11:21
कविता अप्रतिम .. पुन्हा पुन्हा वाचली.. बरेच शब्द माझ्या साठी नविन आहेत .. पण वाचताना छान वाटले एकदम .. लिहित रहा... वाचत आहे