Skip to main content

आखाजीचा सण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गवराईचा सन आला गवराईचा सन आला या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही - पाभे
काव्यरस

वाचने 2846
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

'कैरी आता तुझी नाही..' छानच लिहीलेत.

आवडेश. बाकी फार दिवसांनी दिस्लात पा.भे भाऊ!

मस्त रे ! लेखनसन्यास सोडला म्हणायचा . पाभे वाचक नाखु

ही कविता आहे की लोकगीत ?

कविता आवडली .. खुप दिवसानी इकडे ? एक शंका : गौराई च्या सनात कैरी नसेल बहुतेक झाडाला असे वाटते ..