सय संद्याकाय
लेखनविषय:
- Read more about सय संद्याकाय
- Log in or register to post comments
झाली सय संद्याकाय
दिवे लाव्याचा वखतं
वाट पायता राघुची
तोंड चाललं सोकतं
डोये फाळूनं फाळूनं
काय वाटी नं पायतं
धंदा पळला घरात
जीव काहाले जायतं?
चिळ्या रायल्या भऱ्याच्या
झाला किती वारखोळं
राघू साठी मैना तूहं
कुठी अळलं व घोळं?
अशी तिसऱ्या पायरी
बस्तं धरूनं ऊंबठा
तोही झिंजते घासूनं
तूह्या पायाचा आंगठा