Skip to main content

कविता

दिवाळी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी गुरुवार, 27/10/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा
काव्यरस

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

विश्वस्ता...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 27/10/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वस्ता... जगावेगळा आहे मी फिरस्ता चोखाळतो मी अनोळखी रस्ता लावतो मलम मी परोपरी घाव घालणे हा तुझा शिरस्ता राहतो हजर प्रत्येक समारंभास बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी आयुष्यात काढल्या अनेक खस्ता झालो चरणी लीन नियतीच्या आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता राजेंद्र देवी

माझ्या मनाचे बोल..

लेखक सोहम कामत यांनी बुधवार, 26/10/2016 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....

सानु इश्क लगा है प्यार दा...

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/10/2016 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉगदुवा बरेच दिवसांनी एका गाण्याविषयी लिहावंसं वाटलं. तसं हे गाणं मी बरंच आधी ऐकलेलं आहे. एकदा नव्हे, तर अनेकदा, आणि परत परत. झिंग चढते अशी अनेकदा अनेक गाण्यांची, त्यापैकीच हे एक. a आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.

!!!...अर्थ-हीन चरित्र…!!!

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 26/10/2016 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
!!!...अर्थ-हीन चरित्र…!!! बक्कळ कोरड्या नदीतला, आयुष्याचा हा शेवटचा थेंब… बाष्पी-भवनाने वाफ होण्याआधी… दहा मिनटात… एक अर्थहीन आत्म-चरित्र खरडावं म्हणतोय… खरंतर, जन्मलो त्या दिवशीच भयानक रडलो होतो. आई बाप हसत होते, मी जन्मलो म्हणून अन मी रडत होतो, या जन्मात जन्मायच्या ‘फक्त एक-क्षण-आधी’, गेल्या जन्मात मेलो म्हणून … एक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहिण… --ती तेवढी नाही… (ते दुख आलंच…) काही मित्र, काही शिक्षक, काही पाहुणे, काही वेपराईज्ड नाती………… (तेही दुख आलंच…) अन काही माझीच अनेक मलाच रोज भेटणारी विखुरलेली रूपे…! असे सगळेच आवडायचे मला तेव्हा… (सुरुवातीला लहानपणी हे होतंच...) (नाईलाजाने) मग मो
काव्यरस

दिवाळी

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 26/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय, अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे. जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे. धडधड डबे रिकामे होतायत.. सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत... "दोन किलो आहे, आईने सांगितलंय भाजणीवरच टाका" कशावर काय जातंय बघतच नाही काका, एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे, इकडून टाकलं कि तिकडून पसार, काकांची गिरणी लै फास्ट आहे, पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे? आपला डबा गिरणीत टाकायला काका उचलतायत असं पाहून एक ताई म्हणते, 'काका, लाडवाचं आहे बरंका, जरा

शैशव...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 26/10/2016 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव... जे सुख लाभले शैशवास पुन्हा ना लाभे मानवास अन्न वस्त्र अन निवारा ह्याचाच लागे ध्यास कोठे हरवले ते निरागस बालपण अन विश्वास जसेजसे वाढू लागलो वाढू लागला अविश्वास जन्मताच काय तो घेतला एक मोकळा श्वास आता मात्र घुसमटतोय प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास राजेंद्र देवी

वाट हरवून गेली...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 25/10/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाट हरवून गेली... अशीच ती माझ्या समोरून गेली जणू नभात वीज चमकून गेली मिळता नजर डोळे दिपवून गेली उधळीत गंध उडता पदर सावरून गेली जाता मागे मागे मने जुळवून गेली कळलेच नाही कधी वाट हरवून गेली राजेंद्र देवी

सवाल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 24/10/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी