मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वास्तव

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

वाचने 5766 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अत्रुप्त आत्मा 02/12/2016 - 08:58
+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!

विशाल कुलकर्णी 02/12/2016 - 10:26
_/!\_

मिसळलेला काव्यप्रेमी 02/12/2016 - 17:23
व्वाह, सुंदर

ज्ञानोबाचे पैजार 03/12/2016 - 12:32
भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,

पैसा 03/12/2016 - 23:18
मस्त लिहिलीय!