सय संद्याकाय

ऊध्दव गावंडे जे न देखे रवी...
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा
वर्गीकरण
लेखनविषय:

0 टिप्पण्या 562 दृश्ये