Skip to main content

कविता

वडील

लेखक वृंदा१ यांनी शनिवार, 14/01/2017 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी आहे खूप ढगांत घ्या गुरफटून आम्हां सगळ्यांची माया ऊब देईल आतून .....

वडील

लेखक वृंदा१ यांनी शनिवार, 14/01/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक सणावाराला तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे मी केवळ एक क्षुल्लक खडा पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....

पहाट धुके २

लेखक Pradip kale यांनी बुधवार, 11/01/2017 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.

निळावन्ती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 11/01/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मग निळ्या दरीतुन हाक येताच काफिला उठला नक्षत्रजडित रात्रीला हु॑दका अनावर फुटला त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही काफिल्यात विरघळताना गारूड निळेसे पडले की स्वप्न निळावन्तीचे मी माझ्यावर पा॑घरले
काव्यरस

भक्ष (भयकविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 07/01/2017 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात चालले, चार तरुण मित्र रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं. त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं अंधारात चालले, तिन तरुण मित्र चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर दोनजण उरले, दोघेही घाबरले "कोण आहे तिकडे?" भेदरून ओरडले अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र काय होणार आता,त्याने लगेच ताडलं, चावलं फाडलं अंधारात चालले, चार तरुण मित्र, शोधत होते भक्ष, आठ लाल नेत्र --------------------

घर

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 06/01/2017 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या घरात सध्या असतो त्या घरात आधी रहायचो माहित होती मला भिंत न् भिंत कोपरा अन् कोपरा त्या घराचा आणि सहज जाऊ शकत होतो मी एका खोलीतून दुस-या खोलीत . . . पण आजकाल, कुठल्याही खोलीत गेलो तरी हसते ती खोली माझ्याकडे बघून अनोळखी माणसाकडे बघून आपण हसतो तसं काही काही कोपरे तर दिसतच नाहीत मला भिंती दिसतात....पण त्यांना आता वेगळा रंग आहे दारंही वाढलीयेत घरात तशी दिसत नाहीत....पण आहेत...कळतं मला कधी कधी तर वाटतं बरीच घरं आहेत या एकाच घरात मग मी ये जा करतो या घरातून त्या घरात अगदी बेमालूम पणे...कुणालाही कळू न देता . . . याच घरात मी आशिर्वादही घेतले आणि शापही ईथे कधी पालवी फुटलेला मी अाताशा पाचोळा बनून
काव्यरस

एक दिवस............

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 06/01/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ?

दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन

लेखक स्वप्निल_शिंगोटे यांनी गुरुवार, 05/01/2017 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! " ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे.

दगड!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/01/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
a चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार ब्लॉग दुवा रागाची ती उचल काय, दगड! विचारांची मजल काय, दगड! जात पात वजा भाग गणित गणिताची उकल काय, दगड! अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं पुतळे तोडून तुटंल काय, दगड! देऊळ म्हणून आत गेलो बघत गर्दीपुढे अचल काय, दगड! बळावलेला ज्वर आहे, जबर औषधानं निघंल काय, दगड! तोड-फोड टीका निषेध कहर सरतेशेवटी सफल काय, दगड! नीट बघा, कळणार नाही फर
काव्यरस

सुखाच्या शोधात...

लेखक उपेक्षित यांनी मंगळवार, 03/01/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.

सुखाच्या शोधात...

चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी उपेक्षित....