Skip to main content

कविता

!! माझ्या सवता !!

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 08/11/2016 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान
काव्यरस

वैज्ञानिक दृष्टीकोण

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 07/11/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

नाही का ??

लेखक कवि मानव यांनी बुधवार, 02/11/2016 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे गोडधोड, एकीकडे पोट दौड, सामाजिक विषमता, नाही का ?? एकीकडे धर्मांद वेडे, एकीकडे दैवत्वाचा बाझार, धार्मिकतेचा मुखवटा, नाही का ?? एकीकडे उंच मनोरे, एकीकडे लहानसे घरटे, हरवला मनाचा मोठेपणा, नाही का ?? एकीकडे घनदाट वर्षा ,एकीकडे भयाण आहे सारे, नीसार्गाचाच कोप हा, नाही का ?? एकीकडे तिमिर न संपणारे, एकीकडे प्रकाश झेपावणारा, अज्ञानचा श्राप हा, नाही का ?? एकीकडे स्वार्थी राज्यकर्ते, एकीकडे दैवी श्रमकर्ते, आपल्या जबाबदारीचा अभाव हा, नाही का ?? मी राहतो व्यस्थ, माझ्या सुखाच्या गोळाबेरीजात, कळावे तयांचे दुखं कैसे, नाही का ?? चला बंध तोडू, मिटवू साऱ्या विषमता, हाती उरला वेळ थोडा, नाही का ??
काव्यरस

प्रारब्ध

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 02/11/2016 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारब्ध मुक्त आम्ही मृगद्वय विहरत होतो रानावनात कांचन वल्कले भरली सीतेच्या मनात टाकुनी मंत्र मरीच शिरला सख्याच्या तनात मोहवुनी रामास केला त्याने घात रामाच्या हाती पारध सख्याचे झाले आठवणीच्या ज्वाळेत मी मात्र सती गेले राजेंद्र देवी

कुशी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 02/11/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
कुशी अलगद जेंव्हा तू वळतो कुशीवर रात्र पण करवट घेते अनावर होते झोप अन डोळ्यात स्वप्न उतरते स्वप्नात जेंव्हा तू उतरतो पहाट अपुरी पडते वियोगाच्या कल्पनेने झोप माझी उडते देईन साथ मी कल्पांतापर्यंत देशील ना तू पण ? विचाराने या मी रोज कुशी बदलते राजेंद्र देवी

तुझ्या आठवणीत...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 01/11/2016 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणीत... बहरलेल्या वेलीवर एक कळी खोळंबली तुझ्या आठवणीत ति अजून नाही उमलली गाभाऱ्यातील ज्योत मंदपणे तेवली तुझ्या आठवणीत हळूच लवलवली आभाळातील चांदणी रात्रभर गुरफटली तुझ्या आठवणीत पहाटे ति चमचमली राजेंद्र देवी

स्मरशील का?

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 31/10/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरशील का? सदोदित आईच्या कुशीत कधी माझ्या कुशीत शिरशील का? सदोदित आईच्या मागे मागे कधी माझ्या मागे फिरशील का? सारे हट्ट आईला सांगतोस कधी कधी मला मागशील का? साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस कधी कधी मला सांगशील का? पोटासाठी दूरदेशी मी कधीतरी मला स्मरशील का? राजेंद्र देवी

जीवनातील चंद्रकोर

लेखक सोहम कामत यांनी रविवार, 30/10/2016 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या जीवनात असते, एक चंद्राची कोर, हृदयाच्या कोपर्यात दडते ती, जणु निरागस पोर । कधी नटखट कधी चंचल, कधी लाजाळूचे पान, तिच्या गालाच्या खळीपुढे, हरपते मनाचे भान । हृदय चोरून नेते ती, जाणते मनाचे बोल, ती आहे माझ्यासाठी, चांदणे अनमोल । भारावून टाकते मनास, तिची नखरेल अदा, तिच्या मनमोहक रूपापुढे झाला, माझा जीव फिदा । स्वप्नातील ती परी आता, बनली आहे मनाची आस, सतत तिचेच विचार असतात, सतत तिचाच लागे ध्यास । विचारांच्या या सानुल्या विश्वात ती, जाते मोरपीस फिरवून, तिच्या त्या कटारी नैनडोहात, माझे डोळे जातात हरवून । तिचा मंजुळ आवाज माझ्या, हृदयाला जाऊन छेडतो, तिचा लाजाळू चेहरा मला,

तू ........

लेखक विनायकपाटील८९ यांनी शनिवार, 29/10/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। तू साद दे मी ऐकतो... बघता तुला मी हरवितो... ही स्पंदने.....तुझीच आता.....।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। शोधत होतो तुला, चारही दिशा जरी । कळले ना कधी, होते जवळी तरी ।। शब्द जेव्हा तुझे, येती कानावरी । प्रेमळ दवबिंदू जणू, बनती पानावरी ।। श्रावण सरीनीं मला भिजु दे आता । भेटल्याचा तू आनंद कळू दे जगा ।। परी समान स्पर्श तुझा जाहला मना । परीस स्पर्श ऐकून होतो मिळाला पुरावा ।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।
काव्यरस

क्षणाचे सोबती....

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 29/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणाचे सोबती.... कशाला हवेत नगारे नौबती आपण सारे क्षणाचे सोबती जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती कशाला हवीत रक्ताची नाती नुसतेच फोफावती वृक्ष सारे भगवंताच्या माथी तृणाचीच पाती वृथा तळपती सूर्याची किरणे तिमिरात तळपती समईच्याच ज्योती रोवून दाव एकतरी निशाण जगात आहेत मोजकेच जगज्जेती राजेंद्र देवी