कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..
पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..
-शैलेंद्र
तू असतीस तर ...
अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था !
स्वप्न माझे मनीच माझ्या
जीवन वाहे खळाळ सरिता
गोडी तयांची अवीट भासे
मन.. सरितेचे अबोल नाते
मनास येता भरती माझ्या
जीवन सरिता स्थब्द असे
प्रवाही जीवनाच्या संगे
मन हे वेडे धावतसे
एक स्वप्न-एक सत्य भासे मज
शब्दात वर्णू कसे किती
दोन्ही माझे मी दोघांची
मन-जीवन असे अमूर्त जरी
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह
भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह
ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे
कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे
कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा
तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा
त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी
तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी
विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो
न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो
पाण्याने काळ्या गर्द रंगाचा साज चढवला होता
निळ्याशार पाण्याला काळ करणारा मेघ भरून आला होता
गर्द काळे ढ
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!
मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!
काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!
एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!
—सत्यजित
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे....
(म्हटलेच होते...)
सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी
मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते
एक मिटता नयन अन खुलताही दुसरा
उमटते गाली वलय म्हटलेच होते
वाटली होतीच भीती या क्षणाची
त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!!
'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या
सासवांना मी प्रलय म्हटलेच होते!
-चतुरंग
२१-३-१७