मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

छळ

संदीप-लेले ·
लेखनविषय:
प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात !
उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात !
प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात !

इंद्रजाल

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
वेड लागे या लाजऱ्या कळीला ओघ प्रितीचा दिगंतर परिमळला सख्या अनुरागाचे इंद्रजाल तुझ्या नयनी निर्मल भाव फुलला उभ्या गगनी ह्रदयाची उमलूनी पाकळी मोगरा दरवळला आर्त गीतांचे झाले गोड सूर चांदण्यांची पैंजणे घाली साद मधुर मिठी घाली जीव सख्या तुझ्या काळजाला गूढ अबोल सावली डोळ्यांत दाटली वाट हसऱ्या फुलाची त्यांत दिसली ओढ अनिवार छळे सख्या या घडीला

राधा

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
कृष्ण जाणून घेण्यासाठी, तुला राधा व्हावं लागेल, रुक्मिणीच्या महाली त्याच, येणं जाणं पाहावं लागेल.. पण एकदा तू हे जाणलस कि, सदैव सचैल भिजत राहशील या महालांच्या कोलाहलात पावा होऊन वाजत राहशील.. -शैलेंद्र

तो खुला बाजार होता!

सत्यजित... ·
लेखनविषय:
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

तू असतीस तर

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तू असतीस तर ... अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था !

मन... जीवन...

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
स्वप्न माझे मनीच माझ्या जीवन वाहे खळाळ सरिता गोडी तयांची अवीट भासे मन.. सरितेचे अबोल नाते मनास येता भरती माझ्या जीवन सरिता स्थब्द असे प्रवाही जीवनाच्या संगे मन हे वेडे धावतसे एक स्वप्न-एक सत्य भासे मज शब्दात वर्णू कसे किती दोन्ही माझे मी दोघांची मन-जीवन असे अमूर्त जरी

प्रकाशवाट

·
लेखनविषय:
काव्यरस
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो पाण्याने काळ्या गर्द रंगाचा साज चढवला होता निळ्याशार पाण्याला काळ करणारा मेघ भरून आला होता गर्द काळे ढ

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित... ·
लेखनविषय:
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे.... (म्हटलेच होते...) सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटता नयन अन खुलताही दुसरा उमटते गाली वलय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!! 'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या सासवांना मी प्रलय म्हटलेच होते! -चतुरंग २१-३-१७

चलच्चित्र

संदीप-लेले ·
लेखनविषय:
भुर्रकन इथे, भुर्रकन तिथे उडता पक्षी, काढी नक्षी एक गिरकी, एक फिरकी घेत हलकी, गळे पान की सुळूक असा, सुळूक तसा लवलवता, हलतो मासा शीतल धुंद, झुळूक मंद पहाट वारा, गुलाबी शहारा वेगवेगळी, ऊले पाकळी पहाट वेळी, खुलते कळी प्रकाश बिंदू, निशा समय उडे काजवा, ठाय लय