श्रावणसाद

लेखनविषय:
श्रावणसाद ~~~~~*~~~~~ वर्षभर सोसून, उन्हाचे चटके, अवनी होरपळून, उष्मात निजते, हस्त जोडून, निसर्ग अभिषेक, मुक्त करेल, वेदना व्याकूळ, स्वागत श्रावणाचे, साद मखमली, श्रावण पाळे, साक्ष इंद्रधनू, सृजन सोहळा, वसंत नाचे, कवी- स्वप्ना..

चंद्रकिनार

लेखनविषय:
काव्यरस
मावळतीच्या चंद्रकिनारी श्रावणाची चिंब पहाट उतरुन आला शुक्र निळी निळी पाऊलवाट सावळ्या तरुंच्या छायेत पसरला धुक्यांचा फुलोरा थरथरणाऱ्या पानांतून सांडला शुभ्र कवडसा लाजरा संथ उभ्या जळांत मधुर ओले चांदणे निशब्द ही लहर गाते मंजुळ गाणे वेलींवरचा धुंद गारवा घेवून पंखांच्या कुशीत एक थेंब जागलेला गंध हिरवा वेचित

"ती सध्या कुठे सापडेल"

लेखनविषय:
काव्यरस
"ती सध्या कुठे सापडेल" ~~~~~~~~~~*****~~~~~~~~~~ ती अडथळ्यांमध्ये मार्ग काढताना सापडेल, ती परीक्षां जोमाने देताना सापडेल, ती प्रसंगांना तोंड देताना सापडेल, ती सगळ्यांसाठी दाणापाणी मिळवताना सापडेल, ती घरच्यांमध्ये रमताना सापडेल, ती निस्वार्थ हसताना सापडेल, ती मैत्री निभवतांना सापडेल, ती निसर्गचित्र टिपताना सापडेल, ती कला कौश्यल्यात भरारी घेताना सापडेल, ती लिखाणातून व्यक्त होताना सापडेल, ती पशु,प्राण्यांना

कधी मध्यम,कधी पंचम...

लेखनविषय:
काव्यरस
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले

लेखनविषय:
स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले अरे लेकानो मारले कसले चांगले उभे आडवे हाणले पुढे गेलो तर काय ? जंगली हत्तींचा कळप चालून आला बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला भिरकावून दिले गगनात सारे अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे याच तार्यांचे पाठ गिरविता तुम्हासी न ठावे असे मीच करविता मखलाशी चालू असे मनाशी बहुत लढे उशी घेऊन उशाशी लढता लढता लाथ पसारे बायको उठुनी झाडू मारे स्वप्न मोडिता सत्य अवतरे मारलीस का कधी खरी कबुतरे ? सिद्धेश्वर विलास पाटणकर C

ऐका वेड्याची कहाणी

लेखनविषय:
कोतं कोतं कोतं कोतं त्याचं मन थोडं कोतं तिच्यासंगे राहण्यासाठी जागोजागी पळत होत व्हतं II त्याला काय ठाव अग्नी त्याला नाय ठाव पाणी सात जन्मांची ती राणी ऐका वेड्याची कहाणी II शाळा मॉप त्यो हुंदडला येऊन कॉलेजात पडला सुंदरीला पाहताक्षणी जागच्याजागीच थांबला II हाती धरशी पुस्तकं धरे लेखणी उगाच मन खोळंबले तेथेच जागी नाही रे मस्तक II कुणी मित्र ते दिसेना कुठे जीव तो रमेना राघु असाच सुकला दिसे जागो जागी मैना II करे पाठलाग तिचा कोण मामा अन भाचा सारी माहिती जमवे जन्मदिन तीचा "मे" चा II राणी मॉप ती हुशार करी भविष्याचा विचार राजा पाळतीवर सदा तरी नेहम

शब्द मौनातले

लेखनविषय:
मौनात काळजाला जी आर्त हाक जाई शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई शब्दात वार नाही, ना त्यास धार काही का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही एकांत शब्द काही, शोधावयास जाई शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई ... संदीप लेले

...नवल!

लेखनविषय:
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

पुस्तक

ते पुस्तकच आहे. दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड. एकदा तू वाचलेलं. तू तिथं नसताना मी वाचलेलं. तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही. एकदा तू, नंतर मी. कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली मी तुझे डोळे वाचले. ते पुस्तकच आहे? अजूनही? दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड... -शिवकन्या

प्राक्तनाचे संदर्भ

लेखनविषय:
प्राक्तनाचे संदर्भ अस्तित्वाचे प्रश्न आसपास उत्तरांचे तुकडे साकोळत राहिलो सुदंर कोलाज करता येईल म्हणून प्रत्येक चौकटीत शोधत राहिलो आकार मनात आधीच कोरून घेतलेले ठरवून घेतलेल्या रंगासहित सर्जनचे सोहळे सहज नसतात माहीत असूनही सोयिस्कर दुर्लक्ष करीत गेलो बहरून येण्याआधी उजाड व्हायचं असतं याचं भान राहिलंच नाही ऋतू हलक्या पावलांनी येत राहिले त्यांच्या सोहळ्याना अनेकदा सामोरा गेलोही पण त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी परतीला पावलं लागलेली असायची हाती उरायच्या विसर्जनाच्या देठ खुडलेल्या निष्प्राण खुणा स्वप्नाळलेल्या नेत्रात सुखांचे निर्झर शोधण्याच्या नादात ओथंबलेल्या पापण्यांची थरथर कळलीच नाही थेंबाना
Subscribe to कविता