मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

कावळ्यांची फिर्याद -२

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
कावळ्यांची फिर्याद पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा.... चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा. संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला.... पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला. कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ? क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला. लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
चांद्रयान देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले हसले फिदीफिदी, छद्मवेषी म्हणती नऊशे कोटी मातीत घातले. "आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना, दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को', फिरसे बनाओ चांद्रयान तीन को".... घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले पाहून विक्रमास, तो चंद्र गाल

पावसाचं वय....

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दू

शपथ

मी-दिपाली ·
लेखनविषय:
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥ सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥ एक सूर... द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥ एक सूर... स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥ एक सूर... वासना विकार मीपणा समूळ तो गळो माणसास माणसातलाच देव आकळो देहमंदिरात हाच मंत्रघोष जागवू ॥४॥ एक सूर... (वृत्त - देवराज) १५.८.२०२३

जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली

बाजीगर ·
लेखनविषय:
https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-meeting-with-entrepreneur-a-a719/ जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... दूरातल्या चॅनल चे पापाराझी मांडलेले, भिंगात कॅमेराचे ब्रेकींगन्यूज सांडलेले कैफात ही युतीची अन्‌ पालखी निघाली केस मधल्या जरंडेश्वर कारखान्यास गंध होता श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता वेड्या समर्पणाची वेडी युती मिळाली जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे स्पर्शात *शरदचंद्र* होता, स्पर्शात लाख नारे ओथंबला शाहू-फुल्यांनी अवकाश

चांद्रयान ३

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी.... क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा कसे म्हणू मी..... आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी कसे म्हणू मी..... ...... ...... होईल वर्षाव लाटण्यांचा. जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले.... ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून झेपावतील का लाटा,करतील का कवने? पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र

आयुष्य

सागरसाथी ·
लेखनविषय:
निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

खेळीया शब्दांचा

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी ‐------------------------------------------------ भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या इवल्याशा पावलांनी कृष्ण दुडूदुडू धावतो क्रदंनी सावळ्याच्या सुर बांसूरीचा घावतो शिशिर तोच,तोच वसंत

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

चित्रगुप्त ·
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.