मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?
भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?
मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?
उरात उर्मी,अंगात गर्मी
सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ
रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय
सांग ना रे पावसा तुझं काय वयं?
स्टिलचे पेले,सीलबंद बाटली
पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली
आजुन कसा आला नाही (मित्र)
खड्डय़ात पडला का काय!
सांग ना रे पावसा तुझं वय काय?
डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर
हातात पुस्तक,मनात हुरहूर
"घेतां ना चहा !",बहुतेक कान वाजले
सांग ना रे पावसा अजून किती राहिले!
वाचने
9001
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेशीर मस्त गजब कविता.
कविता आवडली!!
In reply to मजेशीर मस्त गजब कविता. by चित्रगुप्त
"अजून किती (पावसाळे) राहिले"... हुरहुर लावणारा शेवट.
ज्याची जशी असते सय तसं पाऊसाचे असते वय......
In reply to "अजून किती (पावसाळे) राहिले"... हुरहुर लावणारा शेवट. by चित्रगुप्त
हे तर फारच र्हदयस्पर्शी आहे (मला सुचले/समजले नव्हते)
In reply to ज्याची जशी असते सय तसं पाऊसाचे असते वय...... by कर्नलतपस्वी
होय,एक आजार सुद्धा....
दिवंगत पत्नीशी संभाषण, टिनिटस वगैरे.
In reply to होय,एक आजार सुद्धा.... by कर्नलतपस्वी
सुंदर. आयुष्याचा प्रवास
आवडली!
कविता आवडली. प्रत्येक
प्रतीसाद...
आवडली
वाह सुंदर कविता
मजा आया !
आभारी....
मस्त कविता
पैजारबुवा...
In reply to मस्त कविता by ज्ञानोबाचे पैजार
खूपच छान
वा!
मस्त कविता.
सर्व वाचकांचे