Skip to main content

(तो मला खूप आवडतो)

लेखक रुपी यांनी शनिवार, 12/08/2017 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो मला आवडतो जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. जेव्हा किरकोळ लागलं की बँड-एड लावायला सांगतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी योगासने करताना पोटावर येऊन बसतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी जरासं आवरून बाहेर जाताना "आई... तू परी दिसतेस" म्हणतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. कधी घाईत चटका बसतो कधी चुकून बोट कापतं, तेव्हा पळत येऊन बघतो तेव्हा तो मला खूप आवडतो. कधी कधी माझ्या रागवण्यावर रडवेला होऊन जातो, तेव्हा तो मला खूप आवडतो. खाण्या पिण्याचे पदार्थ आवडले की म्हणतो "तूपण खा ना", तेव्हा तो मला खूप आवडतो. शाळेत घ्यायला गेल्यावर, हात पसरून मिठीत येतो, गालावर गोड पप्पी देतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. "आई मला थोपटून झोपव." असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तो मला खूप आवडतो! (प्रेरणा)
लेखनविषय:

वाचने 2150
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हे ही व्हर्जन आवडले पैजारबुवा,