मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।। दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी || उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी | गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे । समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।। अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।। विदग्धतेची लगबग । येरू म्हणतो करावी ||

वाचने 8510 वाचनखूण प्रतिक्रिया 34

चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 14:41
यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हा.... हा .... अग्दी पर्फे़ट ! टाळ्या, टाळ्या, टाळ्या ! चाबूक ..... तोडलंस .. मित्रा !

गबाळ्या Fri, 12/01/2017 - 23:20
मला खूप आवडले. "कमेंटती", "इग्नोरावे" हे शब्दप्रयोग मस्त आहेत. आणि लक्षणे तर चपखलच आहेत :)

एस Sun, 12/03/2017 - 00:28
आमचेकडून कवितेला 'रोचक' अशी श्रेणी देणेत येत आहें. - यत्रकुत्रापि भ्रूः असि एस. ;-)

चामुंडराय Sun, 12/03/2017 - 01:17
भीषण सुंदोर व्वा, काय ती काव्य प्रतिभा. लय भारी :) अनंताचे कैसे विडम्बने | अनंताचे कैसे लिहिणे | स्तोत्राची जिल्बी पाडणे | हुच्च् असे ।। या निमित्ताने आमचीपण झैरात प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।। http://www.misalpav.com/node/40845

मदनबाण Sun, 12/24/2017 - 11:39

राघव Tue, 12/26/2017 - 13:59
=)) =)) मस्त लिहिलेत बुवा! पाणी पितांना न वाचावे ऐसे काही!! ;-)

श्वेता२४ गुरुवार, 04/26/2018 - 16:19
दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। खासच . एक नं. मजा आली