ते...
लेखनविषय:
ते हायेत आपलेचं
असं समजुनं वागलो
केला इस्वासं म्हनून
असे भिकीले लागलो
फोळं ये लोक हाताले
असं दयन दयलं
पिठं भरुन नेतानी
आमी त्याईले पायलं
ताट आमच्या नावाचं
सफा त्याईनच केलं
खाली सांडलं खर्कटं
तेई सावळूनं नेलं
तेल घालून डोयात
केलं पीकाच राखन
देठा लांबोला त्याईनं
ठुली आमाले आकन
शिसी बसले ते आता
जीव काताऊनं गेला
हेला पखाली चा शेवटी
पानी वाहू वाहू मेला
वाचने
3186
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुरेख रचना.
भेदक!
_____/\_____
हम्म
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by सतिश गावडे
बहुधा ठुली म्हणजे ठेवली
In reply to बहुधा ठुली म्हणजे ठेवली by श्रीरंग_जोशी
बहुदा
आवडली
मार्मिक !
आकन
छान कविता.
छान कविता
शिसारी येणे
एकदम
एकदम