'किर्रक्केट'
क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती...
कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!
आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'...